हिंदूंच्या सणांच्या वेळी बंदी का ? बकरी कापण्यावर आणि मोहरमला रक्त वहाण्यावर बंदी का नाही ? @chetan_bhagat

0
697
Google search engine
Google search engine

वाढत्या प्रदूषणामुळे देहली-एन्सीआर् परिसरात फटाके विकण्यावर बंदी

सर्वोच्च न्यायालयाच्या वरील आदेशानंतर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘लहान मुले फटाक्यांविना दिवाळी कशी साजरी करू शकतात ? मी यावर विचारू इच्छितो की, हिंदूंच्या सणांच्या वेळेस अशी बंदी कशी येते ? बकरे कापण्यावर आणि मोहरमच्या वेळी रक्त वहाण्यावर कधी बंदी घालण्यात येते का ? दिवाळीत जसे फटाक्यांवर बंदी घातली, तशी नाताळच्या वेळी ख्रिसमस ट्रीवरही बंदी घाला आणि बकरी ईदला बकरे कापण्यावर बंदी घाला. जे लोक प्रतिदिन प्रदूषण करतात त्यांचे काय? काही लोक फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यात धन्यता मानतात. असे लोक मुक्या प्राण्यांचे बळी थांबवण्यात सक्रीय सहभाग का घेत नाहीत? तुम्ही जे चुकीचे आहे ते सुधारा; मात्र बंदी घालू नका.’