शेतकऱ्यांनी शास्वत शेती करावी – शिवार संवाद सभा : आमदार नानाजी शामकुळे

0
593

चंद्रपूर : 

केंद्र व राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना शेतकऱ्यांकरिता आहे. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतं नसल्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित आहे. या योजनांचा लाभ घेऊन शाश्वत शेती केल्यास शेतकऱ्यांच्या निश्चित आथिर्क दर्जा वाढेल असे मत आमदार नानाजी शामकुळे यांनी व्येक्त केले. ते मारडा, वेंडली, पिपरी या गावात झालेला शिवार संवाद सभेत बोलत होते. 
यावेळी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले, पंचायत समिती सभापती वंदनाताई पिंपळदेन्दे, जी. प सदस्य रणजित सोयाम, पंचायत समिती माजी सभापती बंडू माकोडे, प.स. सदस्य प्रेम चिवंडे, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच नरेश देवलकर, किरण बंदुरकर, विजय आगरे, विनोद खेचले, ऋषी कोवे यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी शास्वत शेती, समृद्ध शेतकरी या माध्यमातून शेतकऱ्यांना रोख मदत, पीक विमा, जलयुक्त शिवार, शेततळे, सिंचन, गाळमुक्त तलाव, शेतीपंपांना वीजजोडणी, शेतकऱ्यांसाठी आरोग्य व अन्न सुरक्षा, पीक कर्ज इत्यादी कार्यंकरी योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार नानाजी शामकुळे यांनी केले. यावेळी शेतकऱ्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. प्रशासनाकरून शेतकऱ्यांना दिरंगाई होत असल्याचा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. शेकऱ्यानी बंधारे, पांदण रस्ते इत्यादी समस्या सांगितल्या आमदार नानाजी शामकुळे यांनी या समस्या त्वरित सोडविण्याचे अश्वसन दिले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्येंक्त केले.