श्री साईबाबा संस्‍थानच्या आय.ए.एस.ॲकॅडमी तुन शेतकऱ्यांची मुलं अधिकारी झाले तर आनंद – डॉ. सुरेश हावरे

0
683
Google search engine
Google search engine

 साईबाबा संस्‍थानच्या आय.ए.एस.ॲकॅडमीच्या अध्यक्ष पदी सुधीर ठाकरे

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )

 श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डी व्दारे साई पालखी निवारा येथे सुरु करण्यात येणाऱ्या आय.ए.एस.ॲकॅडमीच्या गर्व्हनर कौन्सिल पदाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी संमती दिली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. तसेच या ॲकॅडमी तुन शेतकऱ्यांची मुलं आय.ए.एस अधिकारी झाली तर आनंद होईल, असे हावरे म्हणाले.

डॉ.हावरे म्हणाले, ठाकरे हे स्वत: ज्येष्ठ सनदी अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून सेवा निवृत्त झालेले आहे. तसेच महिला, बाल विकास, ग्रामिण विकास आदी शासनाच्या विभागात त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली असून त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विशेष कामगिरी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ते 3 वर्ष अध्यक्ष होते. प्रामाणिक, कष्टाळू, मेहनती व हुशार अधिकारी म्हणून त्यांचा राज्यात परिचय असल्याचे डॉ.हावरे यांनी सांगितले. संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या संकल्पनेतून या आय.ए.एस.ॲकॅडमीची सुरुवात होत असून त्यांच्या प्रयत्नातून या ॲकॅडमीसाठी साईधाम ट्रस्ट विरारचे काशिनाथ पाटील यांनी शिर्डी नजीक असलेल्या साईपालखी निवारा येथील 32 कोटी रुपये किंमतीच्या दोन इमारती संस्थानला देणगी दिलेल्या आहेत. या इमारतींची ताबेपावतीही त्यांनी डॉ.हावरे यांच्याकडे नुकतीच सुपूर्त केलेली आहे. याठिकाणी येत्या 1 ऑक्टोबर पासून ही आय.ए.एस. ॲकॅडमी (प्रशिक्षण केंद्र) सुरु करण्यात येणार आहे. या ॲकॅडमीमध्ये 100 प्रशिक्षणार्थींना प्रवेश मिळणार आहे. एका प्रशिक्षणार्थीस एकदाच संधी दिली जाणार असून प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. देशभरातून नामांकीत प्रशिक्षक याठिकाणी येऊन या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे. तसेच याठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींची शिक्षण, निवास, भोजन आदि सुविधा निशुल्क करण्यात येणार आहे. कोणत्याही शाखेच्या पदवीधर यास पात्र असून स्पर्धा परिक्षामध्ये सहभागी होवू इच्छीणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आपली संपूर्ण माहितीसह श्री साईबाबा संस्थानकडे संपर्क साधावा. या ॲकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उपेक्षित, वंचित, अदिवासी, मागासवर्गीय तसेच खेडोपाडी राहणारा शेतकरी जो अर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे अशा शेतकऱ्यांच्या मुलांना लाभ होणार असून ज्या समाजाची उन्नती साधायची त्या समाजात आय.ए.एस. सारखे अधिकारी जर निर्माण झाले तर त्या समाजाची प्रगती साधण्याचा वेग निश्चितच वाढेल असा विश्वास डॉ.हावरे यांनी व्यक्त केला आहे.