राज्यस्तरीय धनगर समाज वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन

0
1326
Google search engine
Google search engine

> शेगाव : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धनगर समाज सेवा समिती अकोट व तेल्हाराच्या संयुक्त विध्यमाने राज्यस्तरीय धनगर समाज वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन 26 नोव्हेंबर रोजी लाल बहादुर शास्त्री ज्ञानपिठ भुईभार गॅसकोजवळ अकोट येथे करण्यात आलेले असुन धनगर समाज वधू – वर परिचय मेळाव्याचे हे अकरावे वर्ष आहे.
>
> धनगर समाज बांधवांना लग्न करण्यासाठी मुल – मुली पाहण्यासाठी सोईस्कर व्हावे यामध्ये होणार खर्च वाचावा याकरीता दरवर्षी अकोट येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समाज सेवा समिती अकोट व तेल्हाराच्या वतिने राज्यस्तरीय वधू- वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असुन याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगर समाजातील विवाहायोग्य मुला-मुलींची माहिती शुभमंगल पुस्तिकेमध्ये प्रकाशीत करावयाची असुन याकरीता विवाह योग्य मुला- मुलींची माहिती राज्यस्तरीय धनगर समाज वधू- वर परिचय मेळाव्याचे संयोजक रामदास होपळ गुरुजी यांचेकडे 9850683868 या क्रमांकावर संपर्क साधून 15 नोव्हेंबर पर्यंत देण्यात यावे तर शेगाव तालुक्यातील विवाह योग्य मुला मुलींची माहिती 9420562631 या क्रमांकावर देण्यात यावी असे आवाहन शेगाव तालुका संपर्क समितीचे भानुदास बोरसे, प्रशांत मोरे, अमर बोरसे, रमाकांत नवलकार, अशोक तितुर, गजानन गुरव, अर्जुन नागे, मनिष घोंगे यांनी केले आहे.
प्रतिनिधि:-समीर देशमुख