प्रत्येकाने शुद्ध धर्माचरण केल्यास विश्‍व राममय होईल ! – प.पू. श्रीराम महाराज

0
998
Google search engine
Google search engine
प.पू. श्रीराम महाराज यांना दैनिक सनातन प्रभातचा परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव विशेषांक भेट देतांना सनातनचे साधक
सातारा– प्रत्येकाने आद्य कर्तव्य म्हणून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येकाने मनापासून शुद्ध धर्माचरण साधना म्हणून केले, तर संपूर्ण विश्‍व राममय होऊन जाईल, असे प्रतिपादन प.पू. श्रीराम महाराज रामदासी यांनी केले.
येथील सैनिक स्कूल मैदानावर श्रीरामनाम जययज्ञ आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी ते आले आहेत. सनातन संस्थेच्या साधकांनी त्यांचे दर्शन घेतले असता त्यांनी स्वत:चे मनोगत व्यक्त केले. या वेळी सनातन संस्थेचे सर्वश्री आनंदराव पाडळे, विलास कुलकर्णी, श्री. दळवी, हिंदु जनजागृती समितीचे सुनील दळवी, विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प.पू. श्रीराम महाराज म्हणाले की,
१. भगवंताच्या खर्‍या स्वरूपाचे ज्ञान करून देण्यासाठीच संत अहोरात्र झटतात. संत हे परोपकारासाठीच असतात; मात्र त्यांना समाजात धर्मकार्य करतांना अडचणीही येतात. समाजातील अज्ञजन तमोगुणी असल्याने सत्यज्ञान त्यांच्या पचनी पडत नाही; परंतु संत परोपकारी असल्याने ते सर्व सहन करून त्यांच्यावर उपकारच करतात.
२. परात्पर गुरु जयंत आठवले हेही सनातन संस्थेच्या माध्यमातून राष्ट्र-धर्माचे कार्य जगभर करत आहेत. त्याचसमवेत या भूमीवर होऊन गेलेले संत श्री गोंदवलेकर महाराज, संत श्री स्वामी समर्थ, संत श्री गजानन महाराज, संत श्री साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु श्री समर्थ रामदासस्वामी आदी संतांनीही प्राणपणाने हिंदु धर्म रक्षणाचे महान कार्य केले आहे.