वक्फ मालमत्तेचे पूर्ण सर्वेक्षण करणार – श्याम तागडे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राज्यस्थरीय बैठकीत प्रतिपादन

0
769
Google search engine
Google search engine

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) –

वक्फ मालमत्तेचे पूर्ण सर्वेक्षण करणार केले जाईल अशी ग्वाही अल्पसंख्यांक विभागाने प्रधान सचिव श्याम तागडे यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या तेहरीक-ए-औकाफ या राज्यस्थरीय बैठकीत केले.

तागडे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या सर्वेक्षणात पुणे व परभणी या ठिकाणी बरेच चांगले काम झाले असून पुढे राज्यभरातील वफ्क बोर्डाच्या जागा शोधून काढल्या जाणार आहेत. या सर्वेक्षणातून एकही प्रॉपर्टी आणि जागा सुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे जागा कुठेही असली तरी त्याचे सर्वेक्षण केले जाईल. यासाठी सरकारची मदत मिळत आहे, त्यामुळे राज्यातील मुस्लिम समाजाने सतर्क राहून आम्हाला सहकार्य करण्याची गरज असल्याचेही तागडे म्हणाले. राज्य शासनाच्या निर्णयानंतर पुणे व परभणी मध्ये मुस्लिम समाजात दान या कार्याला श्रेष्ठ समजले जाते अशा वेळी मुस्लिम समाजातील पूर्वजांनी दान केलेली जमीन अर्थात वक्फ बोर्डच्या मालमत्तेचे संपूर्ण सर्वेक्षण करून मिळविण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले. मुस्लिम समाजाला न्याय देणे हे माझे कर्तव्य आहे. राज्यात असलेल्या सुमारे 92 हजार एकरहून अधिक जमीन आणि 100 हुन अधिक इतर प्रॉपर्टीचे सध्या सर्वेक्षण सुरू आहे, मात्र यासाठी सर्वेक्षणासाठी वफ्क बोर्डाचे हवे ते सहकार्य अजूनही मिळत नाही. तर त्यातच अनेक मुस्लिम अधिकाऱ्यांना मागणी करूनही एकही अधिकारी बोर्डाच्या कार्यकारी पदावर यायला तयार नाही, यामुळे अनेक अडचणी येत असल्याची खंत अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याक विभागाचे काम हे कठीण असले तरी ते चांगले होईल, त्यातून काही चुकीचे राहणार नाही याची आम्ही काळजी घेत आहे, परंतु वफ्क बोर्डाला त्यांचा सीईओ हवा आहे, त्यासाठी मंत्रालयापासून अनेक अधिकाऱ्याशी बोलणी केली पण एकही अधिकारी या पदावर यायला तयार नाही. यामुळे अडचणी येत आहेत, मात्र त्यातूनही आम्ही चांगले काम सुरू ठेवले असल्याचे तागडे म्हणाले. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या तेहरीक-ए- औकाफ या संघटनेचे प्रमुख शब्बीर अन्सारी यांनी राज्यात वफ्क बोर्डाच्या जमिनी आणि प्रॉपर्टी कशा दुर्लक्षित राहिल्या आहेत, त्यावर इतर लोकांचा कब्जा कसा होत आहे, याची माहिती दिली. दानातून मिळालेल्या जमिनी आणि प्रॉपर्टीची जपणूक करून त्याचा समाज आणि देश विकासासाठी चांगला उपयोग व्हावा यासाठी आम्ही राज्यात त्या जागा आणि जमिनी वाचवण्याची चळवळ सुरू केली असल्याचे अन्सारी यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या वफ्क बोर्डाच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत इस्लामिक जिमखाना येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या तेहरीक-ए-औकाफ या संघटनेच्या वतीने मुंबईत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, सल्लागार मौलाना सय्यद मोईनुद्दीन अश्रफ मोईन मियां,इसाक खडके, संघटनेचे युवक प्रमुख शाहरुख मुलाणी, मिरझाअब्दुल कय्युमनदवी यांच्यासह राज्यातील मौलवी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.