श्री नीलेश विश्वकर्मा रशियाला रवाना -19 वा जागतिक युवा महोत्सव, भारतीय युथ कॉंग्रेस तर्फे निवड

0
714
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे  / शहेजाद खान /-

महाराष्ट्र प्रदेश युवा कॉंग्रेस चे महासचिव श्री नीलेश विश्वकर्मा यांची रशिया येथे होत असलेल्या 19 व्या जागतिक युवा महोत्सवसाठी रशियन समिति तर्फे निवड करण्यात आली असून, भारतीय युथ कॉंग्रेस तर्फे त्यांचे आवेदन भरण्यात आले होते. दी.13 आक्टोम्बर  रोजी ते दिल्ली विमानतळावरुण रवाना झाले आहे.
रशिया येथे होत असलेल्या 19 व्या जागतिक युवा महोत्सवासाठी जगातिल 180 देशाचे युवा प्रतिनिधि सहभागी होत असून 14 ते 24 आक्टोम्बर  या कालावधीत हे आयोजन होत आहे. या महोत्सवमधे परस्परांच्या देशातील सांस्कृतिक, क्रीड़ा, विविध कार्यक्रमाचे आयोजन , आजचा युवक या सर्व बाबींवर चर्चासत्रा चे आयोजन होणार आहे त्यात श्री विश्वकर्मा भारताचे प्रतिनिधित्व करतील. रशियातील डायण्यामिक सिटी असलेल्या ‘सोची’ येथे हे आयोजन केले आहे.
अमरावती जिल्ह्यातून आपल्या सांस्कृतिक, क्रीड़ा, व सामाजिक कार्याला सुरवात केलेल्या नीलेश विश्वकर्मा यांची या महोत्सवसाठी निवड म्हणजे राज्यातील संपूर्ण  युवा पीढ़ी साठी अभिमानाची बाब असल्याचे मत अनेक युवकांनी व्यक्त केले. या महोत्सवसाठी भारतातील अनेक युवकांनी आवेदन अर्ज केले होते. त्यात विविध चाचणी परीक्षा घेऊन श्री विश्वकर्मा यांची या महोत्सवच्या अंतिम यादि मधे रशियन समिती तर्फे निवड करण्यात आली. भारतातून 80 तर महाराष्ट्रातून केवळ 3 युवकांचे यासाठी निवड करण्यात आली. विश्वकर्मा यांचे यूथ कॉंग्रेससाठीच आज पर्यंतचे योगदान, त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळलेल्या अनेक राज्य व जिल्ह्यातील जबाबदाऱ्या या सर्वाचे फलित म्हणून युथ कॉंग्रेस तर्फे या महोत्सवासाठी महाराष्ट्रातुन त्यांना संधी देण्यात आली असल्याचे समजते. त्यांच्या या निवड़ी बाबत दीपक डहाणे,डॉ गणेश वऱ्हाडे, डॉ प्रकाश विश्वकर्मा, राजेश सराफी, श्रीकांत भोयर, प्रशांत बोबडे, केशव केने, नितिन देशमुख,बुराण बोहरा,सुनील भूत यांनी अभिनंदन केले.

पक्षाने टाकलेला मोठा विश्वास -श्री नीलेश विश्वकर्मा

रशिया येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव साठी अर्ज करण्याची अखिल भारतीय युवा कांग्रेस ने मला संधी दिली, त्या भरोशावर
रशियाच्या निवड समिती कडून माझी निवड झाली आहे. 180 देशातील युवकांसोबत विविध स्तरावर चर्चा करता येईल व त्या ज्ञानाचा उपयोग देशातील युवकांसाठी करता येईल याचे मला समाधान आहे, यासाठी पक्षाने माझ्यावर 
टाकलेल्या या विश्वासाबद्दल मी पक्षाचा आभारी असल्याचे मत नीलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.