भारत सरकारच्या २०२२ पर्यंत १०० गिगा वॅट वीज तयार करण्याच्या उद्देशास आम्ही कटिबद्ध- श्री नितीन कापडणीस

0
531
Google search engine
Google search engine
वारी एनार्जीज ली तर्फे महारष्ट्रातील पहिल्या फ्रान्चाईज दालनाची पुण्यात सुरुवात
पुणे, भारतात सौर उर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार सौर उर्जेच्या वापरासाठी व संबंधित उपकरणाच्या उत्पादनासाठी उत्तेजन व सहकार्य देत आहे. २०२२ पर्यंत सौर उर्जेने १०० गिगा वॅट वीज तयार करणे व या क्षेत्रात १०० बिलियन डॉलरची गुंतवणूक आणायचा भारत सरकारचा उद्देश आहे.
या उद्देशाला अनुसरून वारी एनार्जीज ली या भारतातील सर्वात मोठ्या सोलर पॅनेल उत्पादक यांनी अलाईड इलेक्ट्रो यांच्या सोबत महाराष्ट्रातील पहिले फ्रान्चाईज दालनाची सुरुवात पुण्यात केली आहे.  वारीने शहरी व ग्रामीण भागात सौर उर्जेचा वापर यासाठी जनजागृती करण्यासाठी व बाजारपेठ निर्माण करण्यासाठी उचललेले एक महत्वाचे पाउल आहे. या दालनाचे उद्घाटन पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या प्रसंगी बोलताना श्री हितेश दोशी, चेअरमन व व्यवस्थापकीय संस्थापक, वारी एनर्जीज ली म्हणाले, “महाराष्ट्रातील पहिले सौर उर्जा दालन सुरु करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे.  सौर उर्जे विषयी बोलताना मला नेहमी विक्टर ह्युगो यांचे एक वाक्य आठवते ते म्हणजे “ज्या गोष्टीची वेळ आली आहे ती सैन्य देखील थांबवू शकत नाही”.
ते पुढे म्हणाले की “सौर उर्जा क्षेत्रात दर्जेदार उत्पादने व नवीन तंत्रज्ञान अतिशय कमी किमतीत ग्राहकांना पुरवणे आमच्यासाठी सौभाग्याचे आहे. भारताची एकूण सौर उर्जेने तयार होणारी वीज मार्च २०१७ पर्यंत १२.२८ गिगा वॅट इतकी आहे. ही क्षमता मार्च २०१५ मध्ये ३ गिगा वॅट  व २०१६ मध्ये ६.७ गिगा वॅट इतकी झाली. यावरूनच असे लक्षात येते की सोलर उर्जा व्यवसाय अतिशय तेजीत आहे व उत्पादनाचे प्रमाण दरवर्षी दुपटीने वाढत आहे.”
 “ सौर उर्जा क्षेत्रात असलेल्या एकूण १०० गिगा वॅट उद्देशा पैकी ६० गिगा वॅट युटीलिटी स्केल प्रोजेक्ट्स मधून तर ४० गिगा वॅट रुफ टॉप मधून आहे यातील गुंतवणूक दोन लाख करोड इतकी प्रचंड आहे. आपल्या येथे ३०० दिवस सूर्य प्रकाश असतो त्यामुळे सौर उर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणे सोपे व सहज शक्य आहे.” ते पुढे म्हणाले.
या प्रसंगी बोलताना श्री प्रसाद गडकरी व्यवस्थापकीय संचालक अलाईड इलेक्ट्रो म्हणाले “अलाईड इलेक्ट्रो भारताचे सोलर मिशन प्रत्येक व्यावसायिक व घरघुती ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. अलाईड इलेक्ट्रो व्यावसायिक रुफ टॉप, सोलर इंव्हार्टर, वाटर हिटर, सोलर वाटर पंप, स्मार्ट स्ट्रीट लाईट, गार्डन लाईट, एलईडी इत्यादी सेवा पुरवणार”.