*अचलपूर शहरात सिनेट निवडणूकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद*

0
676
Google search engine
Google search engine

अचलपूर: / श्री प्रमोद नैकेले/-

आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट करीता मतदान संपन्न झाले पण अचलपूर शहरात मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.
अचलपूर शहरात सिनेट करिता नोंदणीकृत मतदार ९६० त्यापैकी जगदंब महाविद्यालय येथे २६९ तर भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात ६९२ मतदारांना मतदानाचा हक्क बजावयाचा होता अभाविप व शिक्षक मंच,विजुक्टा व नुटा तसेच स्वतंत्र उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व प्रयत्न करून आपल्या मतदारांना मतदानाकरीता प्रोत्साहीत केले मात्र प्रत्यक्षात दोन्ही मतदान केंद्रावर पाहिजे तसा ऊत्साह दिसला नाही जगदंब महाविद्यालयात केवळ ६२ तर भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात २०४ असे एकूण २६६ अर्थात २७.७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.त्यामुळे उमेदवाराच्या गणिताची वाट लागली आहे.कमी मतदानाचे कारणमीमांसा सर्वच स्तरातून होत आहे.या निवडणुकीत मतदार किमान पदविधारक असतो तरीही ही उदासीनता का हा प्रश्न सर्वांचे चर्चेचा विषय बनला असला तरी पण यावर चिंतन करण्याची बाब आहे.एकतर मतदारांना पाहिजे तसे निवडणूक लढणा-या उमेदवार व पँनलच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधण्यात अपयशी ठरले असतील दुसरे म्हणजे या निवडणुकीला इतर निवडणुकी सारखे देवाणघेवाण चे स्वरूप नसल्याने कार्यकर्त्यामध्ये पाहिजे तसा ऊत्साह निर्माण करण्यात उमेदवार असमर्थ ठरले असतील.तसेच या निवडणूकीचे कार्यकर्त्यामध्ये असलेल्या संकल्पना स्पष्ट झाल्या नसतील शिवाय अचलपूर तालुक्यात असलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुका त्याकरिता नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी जे सिनेटचे सुध्दा मतदार असतील त्यांना ग्रामपंचायत निवडणूक साहित्य चे वाटप सिनेट मतदानाचे दिवशी असल्याने कमी मतदान होण्यास कारणीभूत असू शकते.कारण कोणतेही असो पण मतदारांची निराशा लोकशाही प्रधान या देशात चिंतेची बाब आहे हे मात्र नक्की.