अचलपुर महल फक्शन हाँल मध्ये लग्न समारोह मध्ये गुंडागर्दी

0
716
Google search engine
Google search engine

अचलपूर:-

सकाळी अश्रफपुरा निवासी रज़्ज़ाक खान कादर खान यांच्या घरचा लग्न समारोह महल फंक्शन हाँल देवडी येथे होता व संध्याकाळी अचलपुर अश्रफपुरा चे नगर सेवक नासिर शाह यांच्या मुलीचे साक्षगंध होणार होते.नगर सेवक यांनी आपल्या मुलीच्या साक्षगंध समारोह चे कारणाने सकाळी सुरू असलेल्या लग्न समारंभाला लवकर आटोपण्यास रज़्ज़ाक खान ला म्हटले पण लग्नाचे जेवण सुरू असल्याने वेळेपूर्वी आटोपते घेणे शक्य नव्हते म्हणुन नगर सेवक याने लग्नवाल्या सोबत तु तु मैं  मैं करून घेतली एवढ्यावर हे संपले नाही तर पाहता पाहता प्रकरण मारा पिटी मध्ये बदलले. नगर सेवकाने आपला ताबा सोडून खुर्च्या लाकुड़ यांनी रज़्ज़ाक वर हल्ला केला.रज़्ज़ाक खान डोक्यावर मार लागून जखमी झाले व लग्नात उपस्थित पाहुणे,लहान मुले,वयोवृध्द, महिला व पुरुष मंडळी फंक्शन हाँल सोडून पळायला लागले.ब-याच लोकांनी जेवण सुध्दा केले नाही. फंक्शन हाँल च्या बाहेर सुध्दा भांडण चालत राहिले. घटनास्थळी पोलीसांनी पोहचून नगर सेवक नासिर शाह वज़ीर शाह मुलगा इमरान शाह नासिर शाह व भाउ शाकिर शाह वज़ीर शाह यांना अटक केली. रज़्ज़ाक खान अश्रफपुरा यांच्या तक्रारी वर  पोलिसांनी  3 लोकावर  324,34 अन्वये गुन्हा दाखल केला. अचलपुर पोलीस यांनी संध्याकाळी 6 वाजता सर्व आरोपींना कोर्टात ज़मानत करिता रवाना.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मीणा यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार मडावी करित आहेत.