महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या संपाने प्रवाश्यांचे हाल.. तर खाजगी वाहतूक दारांची दिवाळी

0
1273
Google search engine
Google search engine

अचलपूर/श्री प्रमोद नैकेले/-

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा संप गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.यामुळे प्रवाश्यांचे हाल तर खाजगी वाहतूक दारांची मात्र मस्त दिवाळी साजरी होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक,वाहक व इतर सर्व कामगारांनी १६ सप्टेंबर च्या मध्यरात्री पासून आपल्या रास्त मागण्याकरीता बेमुदत संप पुकारला आहे.परिवहन मंत्र्यांच्या आडमुठेपणामुळे राज्यातील सर्व बससेवा ठप्प झाली त्यातल्या त्यात या दिवसात दिवाळी च्या सुट्या लागल्याने घरापासून दूर शिक्षण व नोकरी निमित्त राहणारे दिवाळी करिता आपल्या मुळ गावी येण्याचे बेतात असतांना परिवहनचा संप म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अचलपूर शहरातील परतवाडा आगारातून सुटणा-या बसेस आगारातच उभ्या आहेत.इतर राज्यतून येणा-या तेथील परिवहन मंडळाची सुध्दा बससेवा परतवाडा आगारातील संपकरी वर्गाने बंद केली आहे.संप शंभरटक्के यशस्वीपणे सुरु असल्याने बसस्थानक व आगारात शुकशुकाट निर्माण झाला आहे.रस्त्यावर एकही चोवीसतास सेवा देणारी लाल एस.टी. दिसेनाशी झाली आहे.या संधिचा मात्र खाजगी वाहतूकदार राजरोसपणे फायदा घेत आहे.ट्रव्हल व कालीपीली मालक जे परिवहन पेक्षा कमी दरात प्रवाश्यांची वाहतूक करायचे त्यांनी आपले तिकीट दर अव्वाचे सव्वा वाढवून प्रवाश्यांची अक्षरशः लुट चालवली आहे.एकिकडे परिवहनचे कामगार आपल्या हक्कासाठी जिवाचे रान करीत असतांना दुसरीकडे खाजगी वाहतूक दार मुर्दयांचे टाळूवरील लोणी चाखत असून निष्पाप जनतेच्या खीश्यावर डल्ला मारून त्यांचे दिवाळे काढण्याच्या प्रयत्नात असतांना सरकार मात्र मुंग गिळून गप्प का असा प्रश्न जनता विचारत आहे.