सरकारशी वाद असतांना जनतेला वेठीस धरणेे कितपत योग्य ?

0
1028
Google search engine
Google search engine

 

ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) कर्मचार्‍यांनी ७ वा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी पुकारलेला संप १९ ऑक्टोबरलाही चालूच होता.व आजही चालूच आहे  एकीकडे राज्यभरात कडकडीत संप पाळल्याने एकही एस्.टी. बसगाडी रस्त्यावर धावतांना दिसली नाही. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने विदर्भ, मराठवाडा येथील दुर्गम भागांत जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दुसरीकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे खाजगी वाहतूकदारांनी भरमसाठ दर आकारून प्रवाशांची लूटमार चालवल्याचे आढळले. त्यामुळे अनेक नागरिकांनी शासन, प्रशासन आणि खाजगी वाहतूकदार यांच्याविषयी संताप व्यक्त केला.