महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या संपाचा चौथा दिवस परतवाडा आगारात शुकशुकाट

0
899
Google search engine
Google search engine

सरकार मस्त प्रवासी मात्र त्रस्त

अचलपूर:/ श्री प्रमोद नैकेले/-

:-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा संप गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे.यामुळे प्रवाश्यांचे हाल होत असून चालक वाहक यांची दिवाळी अंधारात गेली मात्र सरकार व महामंडळाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे यामुळे प्रवाश्यांसोबतच कामगारात सुध्दा असंतोस वाढत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक,वाहक व इतर सर्व कामगारांनी १६ सप्टेंबर च्या मध्यरात्री पासून
आपल्या रास्त मागण्याकरीता बेमुदत संप पुकारला आहे.आज सलग चार दिवस झाले परतवाडा आगारातून सुटणा-या बसेस आगारातच उभ्या आहेत.इतर राज्यतून येणा-या तेथील परिवहन मंडळाची सुध्दा बससेवा परतवाडा आगारातील संपकरी वर्गाने बंद केली आहे.संप शंभरटक्के यशस्वीपणे सुरु असल्याने बसस्थानक व आगारात शुकशुकाट निर्माण झाला आहे.रस्त्यावर एकही चोवीसतास सेवा देणारी लाल एस.टी. दिसेनाशी झाली आहे. असंख्य महामंडळाचे कर्मचारी चार दिवसांपासून घरची दिवाळी सोडून भविष्यात पगारवाढ मिळून चांगले दिवस येतील या आशेवर आगारातच बसून आहेत त्यांचे घरी दिवाळीचा पहिला दिवा सुध्दा लागलेला नाही.दुस-या डेपोचे कर्मचारी 13 सप्टेंबर ला ज्या डेपोत फेरी घेऊन आले तेथेच अडकून आहेत.यावर महामंडळ व सरकार काहीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत नसून कर्मचारी वर्गासोबत प्रवाश्यांचा सुध्दा अंत पाहत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.परतवाडा आगरात संघटनेचे अध्यक्ष प्रवीण राक्षसकर,सचिव मसुदखान,उपाध्यक्ष नसिम खान यांच्या नेतृत्वाखाली हया राज्यव्यापी बेमुदत संपात सर्व कर्मचारी व संघटना एकत्रित येऊन संपाला कोणतेही गालबोट न लागता यशस्वीपणे पार पाडत आहेत.संपकरी कर्मचारी यांना दिलासा देण्यासाठी वाघमारे,जगदीश ठाकुर,शरद भुयार,विनायक खेळकर,विनय चतुर,गोचिडे,कविटकर,अनिल नांदगावकर,निराळे,व आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रयत्नरत आहेत,दिवाळी सारखा अतिमहत्वाचा सण लोकांना सुटीत बाहेर गावी जाण्याची हिच एक संधी मात्र सरकारच्या आडमुठेपणामुळे सर्वांच्या निराशा होत आहे.बस वाहतूक सुरळीत सुरु झाली नाही तर कर्मचारी वर्गासोबत जनतेचा सुध्दा असंतोष भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आतापर्यंत शांततेत सुरु असलेला संप उग्र स्वरूप धारण करून काही अघटीत घडण्यापूर्वीच सरकार,महामंडळ व कर्मचारी संघटना यांनी एकत्र येऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी जनतेची मागणी आहे.संपकरी काही कर्मचारी वर्गासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही दिवसरात्र आपला जिव मुठीत घेऊन बससेवा सुरळीत चालवतो व आमच्या पगारवाढीकरीता पैसे नाही असे उत्तर आम्हाला मिळते.महामंडळाला प्रवाश्यांच्या भाड्यापोटी मिळणारे उत्पन्न आज नुकसान म्हणुन आमच्या माथी मारत आहेत पण राज्यातील शेकडो बसस्थानकावर असलेल्या स्टाल,सायकल स्टँड,भंगार विक्री व नवीन साहित्य खरेदी वर होणारा गैरव्यवहार व त्यामुळे होणारे नुकसानास जबाबदार कोण? तसेच कर्मचा-यांचे पगारवाढीकरीता तिजोरी खाली आहे परंतू बसस्थानकावर निर्थक सुव्यवस्थेवर करोडो रुपये खर्च करून त्यावरची मलाई खाणारे साव व आम्ही आमच्या न्याय्य मागणी करीता संप केला तर नुकसान झाले असे सांगितले जात आहे.जनतेचे हाल होत आहेत हे मान्य आहे परंतू संपूर्ण देशात सहावे वेतन आयोग लागले केंद्रसरकारी कर्मचारी यांना सातवे वेतन आयोग लागले मात्र आम्हाला जुन्याच पगारावर कार्य करावे लागत आहे हा आमच्या वर होत असलेला अन्याय आहे तरी हा अन्याय आम्ही सहन करणार नाही जनतेने सुध्दा आम्हाला सहकार्य करावे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.तसेच आपल्या तीव्र प्रतिक्रिया *राज्य सरकाराचा जाहीर निषेध -*

एसटी कर्मचारी यांच्या संपाच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांच्या अभ्यास करता खालीलप्रमाणे महत्त्वाच्या बाबी निदर्शनास येत आहेत.

तेरा वर्ष काम केलेल्या एसटी कर्मचारी यांचे सध्याचे वेतन – मूळ वेतन 6500 रूपये + महागाई भत्ता 5500 रूपये = एकूण 11000 रूपये.*
*@ पी.एफ. चे 1000 रूपये वजा करता बारा तास काम करून महिन्यांकाठी एसटी कर्मचारी यांच्या हातात मिळतात फक्त 10000 रूपये.
राज्य सरकारी कर्मचारी यांच्या वेतनाशी तुलना करता एस. टी. कर्मचारी यांना सध्या मिळणारे वेतन हे पाचव्या वेतन आयाेगाच्या वेतनाशी मिळते जुळते आहे.
*@ सहाव्या वेतन आयाेगाच्या वेतनाशी तुलना करता अभ्यासाअंती असे लक्षात येते कि वर नमूद केल्याप्रमाणे तेरा वर्ष एसटीमध्ये नाेकरी केल्यास त्या कर्मचारी यांस 25000 ते 30000 रूपये इतके वेतन मिळू शकते.
सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनाशी सध्याचे 10000 रूपये वेतनाशी तुलना करता राज्य सरकारला वेतन करारानुसार 200 % टक्के वेतनवाढ द्यावे लागेल.
एसटी कर्मचारी यांचे वेतनवाढ कशी हाेते – दर चार वर्षांनी कामगार संघटना व एसटी महामंडळ यांच्यामध्ये वेतन करार हाेताे व त्यामध्ये वेतन आयोगानुसार वेतनवाढ न हाेता खाजगी कंपनीसारखे मूळ वेतनाच्या अंदाजे 10 टक्के वेतनवाढ देण्यात येते.
संपाच्या अनुषंगाने एसटी कर्मचारी यांची महत्त्वाची मागणी – पगारवाढीबाबत जुन्या पध्दतीने वेतन करार न करता राज्य कर्मचारी यांच्याप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ द्यावी.*

राज्य सरकारची भूमिका – वेतन आयोगानुसार वेतनवाढ न देता जुन्याच पध्दतीने वेतनकरार करून 10.3 टक्के वेतनवाढ देऊ केली आहे, म्हणजेच तेरा वर्ष नाेकरी केलेल्या कर्मचारी यांना चार वर्षासाठी फक्त मासिक 1030 रूपये इतकी अत्यल्प वेतनवाढ हाेणार आहे. ( वेतनवाढ झाल्यानंतर हातात मिळणारे वेतन – 10000+1030#11030 रूपये )

माझी व्ययक्तिक मध्यम भूमिका – राज्य सरकारशी चर्चा करताना थाेडा कमीपणा घेऊन सातव्या वेतन आयोगाची मागणी न करता सहाव्या वेतन आयोगाची मागणी करावी म्हणजेच राज्य सरकारला 200 टक्के वेतनवाढ द्यावी लागेल हि बाब सर्व एसटी कर्मचारी यांना मान्य असेल त्यामुळे राज्य सरकारला काेंडीत पकडता येईल व आपली मागणी मान्य करून घेता येईल व हि बाब व्यवहारिक व सर्वांना मान्य अशी असेल.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा या संपास जाहिर पाठिंबा कारण राज्य सरकारला सर्व गाेष्टी व कामे करण्यास पैसे उपलब्ध आहेत पण राज्य सरकारी व निम्नसरकारी कर्मचारी यांना वेतनवाढ देण्यास पैसे नाहीत व तिजाेरीत खडखडाट आहे असे सांगतात पण महाराष्ट्रातील सर्व जनता व प्रवाशांनी एक गाेष्ट लक्षात ठेवावी कि बारा तास काम करून एसटी कर्मचारी यांच्या हातात येतात फक्त 10000 रूपये हा कुठला न्याय एक वेठबिगारासारखे काम करून घेतले जाते.

कुठल्याही परिस्थितीत संप मागे घेऊ नका, कारण अभी नहीं ताे कभी नहीं या न्यायाने मिळाले तरच आताच मिळेल कारण राज्य सरकार आता काेंडीत सापडले आहे. राज्य सरकार संपाला घाबरले आहे, या संपामुळे बातमीमुळे सरकारची कर्जमाफीची बातमी हवेत विरून गेली परत आता दिवाळीमुळे प्रवाशांची आताेनात हाल हाेत आहे व त्यामुळे सर्वसामान्य जनता हतलब झाली आहे, नुसते दरराेज 1 GB डाटा फ्रि देऊन हे सरकार टिकणार नाही, सर्वसामान्य जनतेला व कर्मचारी यांना न्याय द्यावाच लागेल हि बाब आता सरकारने लक्षात घ्यावे.अशा शब्दात जाहीर निषेध केला

दिवसरात्र प्रवाश्यांचे हित लक्षात घेऊन प्रामाणिक सेवा देणारे चालक व वाहक चार दिवसांपासून आपल्या रास्त मागण्याकरीता संपावर आहेत दिवसरात्र काबाडकष्ट करून सेवारत असणारे गेल्या चार दिवसांपासून आपल्या घरी गेलेले नाहीत.घरोघरी दिवाळीचे पंचपक्वान,आतीषबाजी व रोशनाईची झगमग सुरु असतांना हे आगरातच स्वतः स्वयंपाक करून जेवन करीत व टाईमपास म्हणून खुल्या बसस्थानकावर क्रिकेट खेळून वेळ घालवत आहेत.