(म्हणे) गांधी, दाभोलकर अन् पानसरे यांच्या हत्यांमध्ये संघपरिवाराचा हात !

0
1119

पुणे (वार्ता.) –

  गांधी, दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येमध्ये संघपरिवाराचा हात आहे. संघाच्या लोकांना संविधानाची मोडतोड करून मनुस्मृतीच्या आधारावर हिंदु राष्ट्र आणायचे आहे. संघपरिवार म्हणजे मनुवादी, जातीयवादी लोकांंचा अड्डा आहे, अशी टीका राष्ट्रद्रोही विचारसरणी असणार्‍या आणि आतंकवाद्यांच्या प्रती सहानुभूती बाळगणार्‍या कन्हैया कुमार यांनी केली. तहसीन पूनावाला यांनी २० मे या दिवशी वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात संविधान आणि संघ या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी कन्हैया कुमार यांनी हिंदुद्वेषाच्या उमाळ्यातून संघपरिवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. शेहला रशीद शोरा, जिज्ञेश मेवानी यांनीही भाषणांमधून हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेतला.