गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी  पकडला ! –  ठानेदार मुकुंद कवाड़े यांची कार्यवाही – ७५ गोवंशाची जीवित सुटका

0
806
Google search engine
Google search engine

 

 

आरोपी ट्रक सोडून पडाले 

बादल डकरे / चांदूर बाजार – 

काल दिनांक 21 ऑक्टबर ला सकाळी 9 च्या दरम्यान शिरजगाव कसबा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यानी स्थानिक शिरजगाव कसबा येथील  कुरैशी मोहल्यात जनवरची मास कत्तल करुण त्याची विक्री सुरु आहे त्यावरून  पोलिसांनी आरोपी
सत्तर खा अब्बास खा वय 59 रा. शिरजगाव कसबा कुरैशी मोहल्ला याच्या राहत्या घरी धाड टाकली यावेळी  सदर आरोपी हा आपल्या राहत्या घरी मास विक्री करताना तसेच एक जीवंत जनावर जे घरात कापन्यासाठी आणले होते तेहि जप्त केले तसेच पोलिसांनी मास कापण्याचे साहित्य ,फ्रिज,असा एकूण 54500 रूपयाचा मुद्देमाल घटना स्थानावरुन जप्त केला.

 

 

(गोवंशियांच्या अवैध वाहतुकीविषयी दक्ष राहून त्याविषयी कृती करणार्‍या पोलीस विभागाचे अभिनंदन  ! – संपादक, vidarbha24news ) 

तसेच आरोपी साबिर खा वय 26 वर्ष,सरफराज खा वय 23 या आझाद चौक कुरैशी मोहल्ला येथून अटक केली आहे.
त्याचप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी जयत मिना यानी राबविल्या विशेष मोहिम अंतर्गत बहिराम चौकी वरील गार्ड कडून सायंकाळी दिनांक 21 ऑक्टबर ला 7.30 वाजता शिरजगाव कसबा पोलिसांना माहिती मिळाली की जनवराची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक  बैतूल वरुण हैद्राबाद च्या दिशेने जात आहे.माहिती मिळताचक्षणी थानेदार कवाड़े आपली टीम घेवून बहिराम चौकिवर पोहचले ट्रक येत असताना दिसताच पोलिसांनी बैरिकेट रोड़वर लावले असता ट्रक मालक याना पोलिसांची भनक लागली आणि ते ट्रक उभा करुण पळून गेले.
ट्रक क्रमाक MP09 H 7077 हा पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण गाय आणि बैल असे एकूण 75 जनावरांची निर्दयपणे  वाहतूक होत असल्याचे पोलिसांचा लक्षात आले.पोलिसांनी गोवंशाची सुटका केली आणि सर्व   गोवंश हे रासेगाव ला गोशाळेत पाठविल्याची माहिती थानेदार कवाड़े यानी दिली.या संपूर्ण कार्यवाहित शिरजगाव कसबा पोलिसांनी एकूण 18,25000 मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत  मिना याच्या मार्गदर्शनखाली थानेदार शिरजगाव कसबा श्री मुकुंद कवाड़े,पोलिस उपनिरीक्षक सुबोध वंजारी,पोलिस कॉस्टेबल साहेबरावजी राजस, आणि शिरजगाव कसबा येथील कर्मचारी यानी केली त्याच प्रमाणे बहिराम चौकी वरील गार्ड ,कर्मचारी यानी केली.वरील दोन्ही कार्यवाही चा तपास शिरजगाव कसबा येथील पोलिस करीत आहे.