परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीराम सेनेकडून महामृत्युंजय याग

0
1128

धारवाड (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियान

यज्ञाच्या वेळी विधी करतांना १. श्री. प्रमोद मुतालिक, त्यांच्या बाजूला सनातनचे साधक २. श्री. राघवेंद्र माणगावकर आणि ३. सौ. रेखा माणगावकर
धारवाड (कर्नाटक) – ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना दीर्घायुष्य मिळावे’, यासाठी त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीराम सेनेकडून १८ मे या दिवशी येथे ‘महामृत्युंजय याग’ आणि ‘श्रीराम तारक होम’ करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध वैद्य डॉ. एस्.आर्. रामनगौडर, धारवाड येथील श्री जगद्गुरु शंकराचार्य पाठशाळेचे पं. नागेशशास्त्री जोशी, सहकारी धुरीण संघटनेचे श्री. रवी एलिगार, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर आदी मान्यवर उपस्थित होते.