दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी।। गवळण, गाईगोधन, ची परंपरा कायम

0
987

चांदूर रेल्वे :- (शहेजाद  खान)-

 

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, आली आली हो दिवाळी, बहीण भावा ओवाळी अशा अनेक प्रकारच्या गवळण गात दिवाळी सणाच्या अनेक परंपरा आजही गावाकडे जपल्या जात आहे.

शहरातील जुनी वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार चौक, डांगरीपुरा, महादेवघाट, खडकपुरा हा भाग शेतकरी शेतमजूर बहुल असून प्रत्येक सण या परिसरात आजही जपल्या जातात. दिवाळी निमित्त दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेणाचा महिषासुराचा पुतळा बनविल्या गेला तर अनेक गाई म्हशी रंगवल्या सुध्दा होत्या. आजही घरोघरी वाजंत्री येऊन फराळाची मागणी होते. भाऊबीजेच्या दिवशी या भागात पुरुष मंडळी गवळणीचा वेष परिधान करून गल्लोगल्ली फिरून महाराष्ट्राची परंपरा असलेली गवळण जोपासली. या परंपरा  जुन्या पिढीकडून नवीन युवा पिढी हि अंगिकरात आहे. अनेक तरुण शेतकरी या परंपरा जपत आहे. संपूर्ण पावसाळा शेतीचे कामे करून दिवाळीत घरी पीक आल्यानंतर थोडे मोकळे झालेले शेतकरी आपला आनंद या सणासुदीला विविध परंपरेच्या माध्यमातून व्यक्त करतात.  शनिवारी स्थानिक सरदार चौक परिसरात घरोघरी गवळण गात या गवळण व तिच्या चमूने लोकांचे मनोरंजन केले.