शासकीय केंद्रावर प्रत्यक्ष तुर न आणता टोकन द्यावे संचालक बबनराव गावंडे यांची मागणी पावसाने तुर भिजुन होऊ शकते नुकसानचांदुर रेल्वे – शहेजाद खान )

0
1175
Google search engine
Google search engine
( फोटो – बबनराव गावंडे )


चांदुर रेल्वे – शहेजाद खान  )

शासकीय खरेदी केंद्रावर तुरीचे पावसामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय केंद्रावर प्रत्यक्ष तुर न आणता केवळ आवश्यक कागदपत्रे सादर करून टोकन द्यावे अशी मागणी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव गावंडे यांनी केली आहे.
      पावसाचे दिवस जवळ येत असुन तालुक्यातील शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तुर बाजार समितीच्या आवारातच पडुन आहे. तसेच सद्या तुर ठेवण्यासाठी जागेची उणीव सुध्दा भासत आहे. अद्यापही बाजारात मोठ्या प्रमाणात तुरीची आवक सुरू आहे. आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोजमापसाठी होणारा विलंब व त्यातच पावसाचे संभाव्य होणारे आगमन यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्मान झाली आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रावर तुर सोबत न आणता केवळ सातबारा उतारा, पीकपेरा, आधार कार्डची झेरॉक्स, यावर्षी तुर विकली असल्यास कोणत्या बाजार समितीमध्ये विकली, किती क्विंटल तुर विकली याची माहिती, मोबाईल क्रमांक व बैंक खात्याचा तपशील दिल्यानंतर कागदपत्रांची शहानिशा करून टोकण द्यावे तसेच टोकन क्रमांक येईल तेव्हा संबंधित शेतकऱ्याला दुरध्वनीवर संपर्क करून किंवा निरोप देऊन तुर बाजार समितीमध्ये आणण्यास सांगावे, अशी पध्दत लागु करावी. यामुळे शेतकऱ्याचे संभाव्य पावसामुळे होणारे नुकसान टाळता येईल व बाजार समितीमध्ये गर्दी होणार नाही. म्हणुन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शासकीय केंद्रावर प्रत्यक्ष तुर न आणता पहिले टोकन द्यावे अशी मागणी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव गावंडे यांनी केली आहे.