*शाश्वत योगीक शेती कार्यशाळेचे लोणी येथे आयोजन*

0
827
Google search engine
Google search engine
                                रिसोड / महेद्र महाजन जैन /- 




-तालुक्यातील लोणी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा रिसोड च्या वतीने शाश्वत योगिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.२२मे च्या सायंकाळी ६:३० वाजता लक्ष्मी नारायण मंदिरात डॉ प्रवीण लढ्ढा यांच्या दवाखान्याच्या बाजूला होत असलेल्या कार्यशाळेत शेतकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ब्रह्माकुमार विजय भाई माजी प्राचार्य आई टी आई अकोला,राजयोगिनी ब्राह्मकुमारी स्नेहलता दीदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शेती हा ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे शेतीच्या उत्पन्नावर शेतकरी व शेतमजुराची उपजीविका व जीवनमाना चा दर्जा अवलंबून आहे.निसर्गाच्या लहरीपणा मुळे अवाढव्य खर्च करूनही उत्पन्न होत नसल्यामुळे शेतकरी तणावाचे व नैराश्याचे जीवन जगत आहे. भारत हा अध्यात्मिक पाया असणारा देश आहे शेती साठी सुद्धा काही शाश्वत योगिक पद्धतीचा उपयोग केल्यास उत्पन्नात वाढ करून निसर्गाचा ऱ्हास व शेतीची कमी होणारी प्रत थांबविता शक्य आहे त्यादृष्टीने ही कार्यशाळा महत्वाची ठरणार आहे. राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन च्या ग्रामविकास प्रभागाद्वारे ईश्वरीय ज्ञान व राजयोगावर आधारित शास्वत योगिक शेती,नव्या गुणांसाठी नवे पाऊल हा प्रकल्प देशभर राबविला जात आहे या शेतकरी हिताच्या कार्यशाळेला तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन राजयोगिनी ब्राह्मकुमारी ज्योती दीदी संचालिका प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय रिसोड यांनी केले आहे.