*रिसोड शहराच्या विकासकामांना सहकार्य म्हणजे जन्मभूमीची सेवा ——- श्री मन्नालाल अग्रवाल*            

0
676
रिसोड /महेंद्र महाजन जैन /-



रिसोड पोलीस स्टेशन च्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी     अजंता फार्मा चे संचालक दानशूर व्यक्तिमत्  अग्रवाल तर प्रमुख अतिथी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे,  उपविभागीय पोलिस अधिकारी जयकुमार चक्रे,उत्तमसेठ बगडे,मुख्याधिकारी न.प  सुधाकर पानझडे,पोलीस निरीक्षक प्रकाश डुकरे पाटील, अभियंता देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 रिसोड पोलीस स्टेशन ची निर्मिती जवळपास शंभर वर्षांपूर्वी झाली त्यावेळेस ची लोकसंख्या कमी होती व पोलीस कर्मचारीही कमी होते परंतू वेळेनुसार वाढत्या संख्येनुसार इमारतीचा विस्तार होणे अपेक्षित आहे.मन्नालाल अग्रवाल यांचा जन्मभूमी प्रति विकासकामांना मदतीचा दृढनिश्चयातून सदर सभागृह तयार झाले आहे. मन्नालाल अग्रवाल च्या मते विकासकामांना सहकार्य म्हणजे जन्मभूमीची सेवाच आहे.पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीमुळे पोलीस स्टेशन च्या व्यवस्थापनात  सुलभता येणार असून अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यप्रनालीला गती मिळणार आहे. अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे व जयकुमार चक्रे यांनी आपल्या भाषणातून मन्नालाल अग्रवाल यांचे मनस्वी आभार मानले. अग्रवाल यांनी नगर परिषद शाळेच्या इमारतीचे आकर्षक बांधकाम करून दिले हिंदू स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाकरीता मदत केली तर न प कन्या शाळेचे काम प्रस्तावित आहे या सर्व कामाबद्दल मुख्याधिकारी पानझडे यांनी अग्रवाल यांची स्तुती करीत धन्यवाद मानले. या नवीन सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी डॉ विजयप्रसाद तिवारी, बद्रीसेठ तोष्णीवाल,सदाशिवराव गाडे,नगरसेवक मोहनराव देशमुख, पप्पीबाई कदम, बाळासाहेब केदारे, पत्रकार पी डी पाटील, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक कुदळे, सचिव विवेकानंद ठाकरे,कार्याध्यक्ष रवि अंभोरे, अनंत भालेराव, सुरेश गिरी,          मंचकराव देशमुख,शीतल धांडे, संतोष गोमासे,काशिनाथ कोकाटे,निनाद देशमुख, अर्जुनराव खरात, विनोद खडसे,लखनसिंह ठाकूर,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रत्नपारखी,पोलीस निरीक्षक कमल शिंदे, रवींद्र हुंडेकर,कॉन्स्टेबल सरनाईक,शांताराम राठोड, गणेश कोकाटे,सुधीर सोळंके         इत्यादी सह पत्रकार, न.प कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार संचालन सोनल श्रीराव यांनी केले. प्रस्ताविक स.पो.नि विजय रत्नपारखी तर आभार ठाणेदार प्रकाश डुकरे पाटील  यांनी मानले.