शिवछत्रपती पुरस्कार यंदापासून क्रीडा पत्रकारांना देणार – क्रीडामंत्री विनोद तावडे

0
1543
Google search engine
Google search engine

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी )

 

राज्य सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांना देण्यात येणा-या शिवछत्रपती पुरस्कारामध्ये यंदापासून क्रीडा पत्रकारांचाही समावेश करण्यात आल्याची घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी पारितोषिक वितरण समारंभ २०१७ चे वितरण आज क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना तावडे म्हणाले की, शिवछत्रपती पुरस्काराची निवड करताना कोणतेही राजकारण वा वशिलेबाजी चालणार नाही. यापुढे क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक पुरस्कारासाठी गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास भारताचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत रघुनंदन गोखले, ग्रँडमास्टर प्रविण ठिपसे, जेष्ठ टेबलटेनिस पटू कमलेश मेहता, अर्जुन पुरस्कार विजेते श्रीमती मोनालिसा मेहता आणि माजी कसोटीपटू प्रविण आमरे आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मलेशियावर मात करुन आशिया कप स्पर्धेत हॉकीचे विजेतेपद पटकावलेल्या भारतीय हॉकी संघातील गोलकिपर आकाश चिकटे याला यंदाचा स्पोर्टसमन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बुध्दीबळपटू विदित संतोष गुजराथी यालाही स्पोर्टसमन ऑफ द इयर हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. अन्य श्रेणींमध्ये खालील उत्कृष्ट क्रीडापटूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.