समाजातील वंचित घटकांबरोबर “रोशनी दिलसे “ ने केली दिवाळी साजरी दीडशे मुलांसोबत साजरी केली दिवाळी

0
1348
Google search engine
Google search engine

 पुणे :

मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. प्रत्येकाला सण, समारंभ, उत्सव साजरे करायला आवडतात. मात्र काहींच्या वाट्याला हा आनंद येत नाही. वंचित मुले-मुली, अपंग, गतिमंद व उपेक्षित घटकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून “एक घास फराळातील “ या संकल्पनेतून पुणे येथील रोशनी दिलसे या कार्यक्रमाच्या  निमित्ताने गोरगरीब मुलाना मिठाई व गेमिंग झोन, फूड झोन तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत असून समाजातील दानशूर व्यक्तीनीही उपेक्षितांना आधार देणे गरजेचे आहे.

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. दिवाळी सण प्रकाशाचा, दिव्यांचा सण पण काही जणांच्या जीवनात कायमच अंधार असतो. त्यांच्या वाट्याला आनंद कमी आणि दु:खच जास्त असते.सुखाचा गुणाकार व्हावा आणि  दु:खाचा भागाकार व्हावा. मात्र काहींच्या वाट्याला नेहमीच दु:ख, वेदना आणि भटकंती असते. समाजात असे अनेक घटक आहेत त्याना खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची नाही तर आपुलकीची गरज आहे.त्या उपेक्षित घटकांनाही सण, उत्सव साजरे करण्याचा हक्क आहे. मात्र त्यासाठी समाजातील मोठ्या व्यक्तींनी एक पाऊल पुढे टाकून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. असे झाले तर समाजातील प्रत्येक घटक आनंदात जीवन जगेल.

रोशनी दिलसे या बॅनर खाली शीतल आरफल यांच्या संकल्पनेतून या उपेक्षितांचे दु:ख समजून घेऊन  समाजातील गोरगरीब अनाथ तसेच गतिमंद अशा दीडशे मुलांसोबत  दिवाळी साजरी करून आपुलकीची साथ दिली आहे. याप्रंगी या मुलांना पुण्यातील कुमार पॉसफिक मॉल मधील विविध खेळणी , त्यांच्या न्याहारी तसेच त्यांना स्पेशल दिवाळी गिफ्ट यावेळी देण्यात आली. या मुलानी आपल्या कला देखील यावेळी सादर केल्या , काही मुला-मुलींनी गाणी सादर केली तर काही मुला-मुलींनी डान्स सादर करुन उपस्थित नागरिकांचे मने जिंकली. याप्रसंगी आय सी सीचे संचालक एजाज इनामदार , डॉ.विनोद शहा,राजकुमार राठोड ,मीना नहार आदी उपस्थित होते . जनसेवा फाउडेशन , नचिकेत बालाग्राम , ममता फाऊडेशन , टूबा फाऊडेशन, माहेर फाऊडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल आरफल यांनी केले.