ऑटोरिक्षा व टॅक्सीवर परवानाधारक व चालकांची माहिती बंधनकारक

0
545
Google search engine
Google search engine

भंडारा –

प्रवाशांच्या माहितीसाठी व गैरप्रकारास आळा घालण्यासाठी प्रत्येक ऑटोरिक्षा व टॅक्सी या वाहनांमध्ये परवानाधारक व चालक यांची माहिती जसे परवानाधारक व चालकांचे छायाचित्र नाव, पत्ता, अनुज्ञप्ती क्रमांक, वैधता, दुरवनी /मोबाईल क्रमांक, मोटार वाहन क्रमांक, परवानाक्रमांक/वैधता, आपत्कालीन मदतीसाठी व तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक व मोबाईल ॲप दर्शविणारे स्टिकर प्रवाशांना सहज दिसतील अशा पध्दतीने लावण्याची अट परवानाच्या अटी व शर्तीमध्ये अंतर्भाव करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे.
स्टिकरचा नमुना संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध असून सदर नमुना त्या कार्यालयाकडून प्रमाणित करुन परवानाधारकाने आपल्या वाहनामध्ये प्रवाशांना सहज दिसेल अशाप्रकारे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. सदर अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास परवानाधारक व चालकावर मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 86 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे यांनी केले आहे.