डॉ. पोकळे अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी विजयी

0
703
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे / शहेजाद खान /-

 

शारिरीक शिक्षण अभ्यास मंडळाच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची नुकतीच सिनेट सदस्यपदाची निवडणुक पार पडली. यामध्ये शहरातील राम नगर परीसरात राहणारे डॉ. प्रमोद पोकळे हे विजयी झाले आहे. थानिक लहानुजी महाराज शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद सुधाकरराव पोकळे हे अमरावती विद्यापीठाच्या शारिरीक शिक्षण अभ्यास मंडळाच्या सिनेट सदस्य पदाकरीता उमेदवार होते. या निवडणुकीत ते विजयी झाले आहे. सदर निवडणुक ही पाच जिल्ह्यातुन होती. पोळके यांच्यासमवेत डॉ. अमोल देशमुख व डॉ. अनिल चव्हाण सुध्दा निवडुन आलेले आहेत. डॉ. प्रमोद पोकळे हे तालुक्यातील लहानशा मालखेड (रेल्वे) गावातुन जन्म घेऊन आज ह्या अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदावर निवडुन आले.