सोयाबीन आहे की चुनखडी – काढणी चा खर्च ही-निघणे अपेक्षित नाही . बाजार भावही कमी

0
1070
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार-

चांदुर बाजार तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर घातला असल्याने सोयाबीन पीक पूर्णतः जमीन डोस्थ तर झालेच त्याच प्रमाणे ज्या भागात परतीच्या पावसाचा कमी प्रमाणात पडला त्या भागात सोयाबीन पीक हे चांगले होते.सोयाबीन काढणी ला आले असताना अचानक पाऊस बरसला आणि काढणी ला आलेल्या सोयाबीन चे नुकसान करून परत गेला.

परतीच्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन सोयाबीन ओले तर केले त्याच प्रमाणे सोयाबीन हे पूर्णतः काळे झाले आहे.काही भागात शेतकरी याना एकरी 2 पोटे तर कोठे एकरी 1पोटे अशा उत्पादन झाल्याचे दिसून आले आहे.
काढणी चा खर्च पाहता 2000 रुपये प्रति एकर मात्र एक एकर मध्ये सोयाबीन फक्त एक किंवा दोन पोटे झाल्याने मजूर याना काय द्यावे आणि आपण काय ठेवावे अशा प्रश्न शेतकरी वर्ग समोर आहे.
सोयाबीन कसे तरी काढणी केली तर ज्या भागात परतीचा पाऊस जोरदार बरसला त्या भागात सोयाबीन काढणी नंतर ओले असल्याने त्यामध्ये मोठया प्रमाणात काळसर पणा आणि माती असल्याचे दिसत आहे.त्यामुळे 2500 प्रति किटल खपणारे सोयाबीन(चांगल्या दर्जा) आता काय भाव खपणार हे सुद्धा शेतकरी याना चिंता लागून आहे.काढलेले सोयाबीन हे जणू चुनखडी प्रमाणेच दिसत आहे.त्यामुळे लवकरात लवकर याबाबत सरकार ने दखल घेऊन शेतकरी याना मदतीची आस लागली आहे.