चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नाफेड खरेदी केंद्र सुरू – विक्री करीता करावी लागेल ऑनलाइन नोंदणी

0
1073
Google search engine
Google search engine

सातबारा,आधार कार्ड,पेरेपत्रक, बॅंक पासबुक झेरॉक्स आवश्यक

बादल डकरे / चांदुर बाजार –

चांदुर बाजार येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येते दिनांक 24 ऑक्टोबर ला मुग, उडीद,सोयाबीन या पिकाचे नाफेड केंद्राचे शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती अरविंद लंगोटे यांच्या हस्ते करण्यात आला.

नाफेड मधील पहिला खरेदीचा सन्मान हा तळवेल या गावचे शेतकरी नंदू भाऊ काळे याना मिडाळा.यावेळी शेतकरी यांनी आपल्या मूग ,उडीद ,सोयाबीन या पिकाची विक्री करायची असल्यास त्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे महत्त्वाचे असल्याचे मान्यवर यांनी सांगितले.याकरिता शेतकरी बांधव यांनी आपला सातबारा,पेरेपत्रक,आधार कार्ड,बँक पास बुक झेरॉक्स घेऊन चांदुर बाजार येथील खरेदी विक्री कार्यल्यात जाऊन नोंदणी करावी लागेल.असे पदाधिकारी यांनी सांगितले तसेच कोणत्याच प्रकारचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दखल सुद्धा घेण्यात यावी असे सांगण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती नंदकिशोर वासनकर संचालक,हरिभाऊ धोंडे,सतीश मोहोड,विनोद जवजाळ ,कांतीलाल सावरकर,विलास तायवाडे,सुरेश विधाते,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव मनीष भारबे ,तसेच खरेदी विक्री चे अध्यक्ष शिवाजी बंड,उपाध्यक्ष श्रीपाद आसरकर,मार्के फेडरेशन चे रामकृष्ण बर्वे,विजय बोबडे,आणि तसेच हमाल आणि बाजार समिती कर्मचारी उपस्थित होते.