चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, हमालाचा शेतकऱ्यावर  हल्ला पोलीसात तक्रार, शेतकऱ्याचा डोळ्याला गंभीर मार

0
675
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे /शहेजाद खान –

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीनच्या हर्रासावरून शेतकरी व
व्यापारी यांच्यात वादावादी होऊन व्यापारी व हमालांनी शेतकऱ्यावर  हल्ला केल्याची घटना
गुरूवारी(ता.२६) दुपारी २ वाजता दरम्यान घडली.शेतकऱ्याचा उजव्या डोळ्याला गंभीर मार
लागल्यामूळे त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,चांदूर रेल्वे तालुक्यातील तरोडा येथील सुरनसिंग शिक्षण भोसले
(वय३२) याने सोयाबीनचे २३ कट्टे विक्रीसाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आनले
होते. हर्रास करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्याचा माल केवळ १२०० रूपयात मागीतला. त्यामूळे
चिडलेल्या सुरनसिंग याने व्यापाऱ्याला शिवीगाळ केली. त्यामूळे व्यापाऱ्यांनी व हमालांनी
शेतकरी सुरनसिंग भोसले याला जोरदार मारहाण केली. यामध्ये सुरनेसिंग यांच्या उजव्या
डोळ्याला गंभीर जखम झाली. या प्रकरणी सुरनसिंग भोसले यांचे भाऊ रामेश्वर शिक्षण
भोसले रा.तरोडा यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.पोलीसांनी जखमी
सुरनसिंग याला अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन
पुढील तपास करीत आहे.

सदर प्रकाराला शेतकरी जबाबदार-सभापती श्री प्रभाकर वाघ

बाजार समितीमध्ये हर्रास करून नेहमी शेतमाल घेतल्या जातो.हर्रासच्या वेळी सुरनसिंग
भोसले हा दारू पिऊन दंगामस्ती करीत होता. हर्रासच्या वेळी व्यापारी व हमालांना त्याने
शिवीगाळ करणे सुरू केले. त्याला शांत करण्याचा प्रयत्न तिथे झाला. या सर्व प्रकाराला
शेतकरी भोसले जबाबदार आहे असे मत सभापती प्रभाकर वाघ यांनी यावेळी व्यक्त केले.