चांदुर रेल्वेत गुन्हे शाखेची क्रिकेट सट्ट्यावर धाड – दोन बुकींना अटक – अनेक दिवसांपासुन शहरात सुरू होता सट्टा

0
712

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .) 

 

जिल्हास्तरावरच नव्हे तर आता तालुकास्तरावर सुध्दा सट्ट्यावर लाखो रूपये उधळले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. चांदुर रेल्वे शहरात बुधवारी भारत-न्युझीलंड संघादरम्यान दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर सुध्दा लाखो रूपये उधळल्या गेले आहे. यामध्ये शहरात धाड टाकुन गुन्हे शाखेने दोन बुकींना अटक केली आहे.
चांदुर रेल्वे शहर जिल्ह्यातील एक महत्वाचे मुख्य सट्ट्याचे केंद्र बनले आहे. गेल्या काही महिन्यापासुन अमरावती गुन्हे शाखेने एकही मोठा गुन्हा उघडकीस आणला नव्हता. याबद्दल वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता. अशातच चांदुर रेल्वे शहरात भारत-न्युझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट सट्ट्यावर पैशांची उधळपट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे शहरातील मिलींद नगरामध्ये उमेश इंगळे याच्या घरी गुन्हे शाखेने धाड टाकुन बुकी सचिन घनश्यामदास लोया (37, मार्केट लाईन) व उमेश मधुकर इंगळे (38, मिलींद नगर) यांना सट्ट्याचे आकडे घेत असतांना पकडले. घटनास्थळावरून एक एलसीडी, चार मोबाईल, एक नोंदवहीसह 31 हजार चारशे रूपयांची रोख रक्कम जप्त केली. हे दोघे लहान स्तरावर सट्टा लावत होते व मोठ्या सट्ट्यासाठी नागपुर येथील बुकी पवन रॉय सोबत संपर्क करीत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीसांनी घटनास्थळावरून सर्व मोबाईल नंबरसुध्दा जप्त केले असुन पवन रॉय नामक व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे समजते. अटक केकेल्या दान्ही आरोपींकडुन तसेच पवन रॉय ला अटक करून मोठ्या प्रमाणात सट्ट्यांची माहिती पोलीसांना मिळु शकते. चांदुर रेल्वे शहरात अनेक दिवसांपासुन सट्ट्यावर कोटींची उधळन सुरू होती. मात्र शहरातील पोलीसांनी याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर गुन्हे शाखेने धाड टाकुन शहरातील सट्ट्यांचे प्रमाण कमी केले आहे. अटक केलेल्या आरोपींवर कलम 4,5 मुंबई जुगार कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.