एसटी कंडक्टरची पत्नीसमवेत रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

0
1278
Google search engine
Google search engine

सातारा : एसटी कंडक्टरने पत्नीसोबत रेल्वेखाली उडी घेतली आणि जीवनयात्रा संपवली. सातारा जिल्ह्यातील ओगलेवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे.

बबन पवार आणि कल्पना पवार या दाम्पत्याने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. बबन पवार हे कराड एसटी आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत होते.

मुलगी गौरीने प्रेमविवाह केल्याच्या कारणातून पवार दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.