डॉ.वसुधा बोंडे यांची आगपिडीत कुटुंबांना सात्वंता.- आगजनी येथे अनेक घरे जळून उद्ववस्त.

0
740
Google search engine
Google search engine
वरुड :
 शहरातील मिरची प्लॉट झोपडपट्टी परिसरात बुधवार दि. १७ मे २०१७ रोजी दुपारी २ वाजता दरम्यान अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या अग्नीतांडवामध्ये परिसरातील दोन झोपड्या पूर्णत: जळून खाक झालीत तर अनेक घरे जळून उद्ववस्त झाल्याची घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेंदूरजना घाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे यांनी स्वत: अग्निशमन दलाच्या गाडीत बसून सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर वरुड नगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी पुढाकार घेऊन आग नियंत्रनात आणण्यास मदत केली. यादरम्यान वरुडचे तहसीलदार आशिष बिजवल, ठाणेदार गौरख दिवे, डॉ.वसुधाताई बोंडे, संतोष निमगरे, हर्षद रक्षे, राजू बसले, हरिविजय गेडाम, प्रवीण शेषेकर, संदीप बर्थे यांच्यासह परिसरातील नागरिक आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ.वसुधाताई बोंडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून आगजनी पिडीत कुटुंबांना आर्थिक मदत करून सात्वंना दिली.