कचरा डेपो हटविण्यासाठी ३0 ऑक्टोंबरला आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन @abhijitbangar @CMOMaharashtra

0
587
Google search engine
Google search engine

अमरावती :- 

 

 

अमरावती महानगर पालिका परिसराला लागून असलेले मौजा अमरावती पेठ सर्व्हे नं. १५६ व १५७ येथे अनेक वर्षापासून कचरा डेपो आहे. महानगर पालिका प्रशासना तर्फे शासकीय नियमानुसार कोणतीही दखल व घनकचर्‍याची विल्हेवाट लावल्या जात नाही. त्या मुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांना प्रदुषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. कचरा डेपो शहरा बाहेर नेण्यात यावा. या मागणीसाठी येत्या ३0 ऑक्टोबर रोजी. स्थानिक राजकमल चौक येथे. एक दिवसीय धरणे. आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पत्रपरिषदेत प्रसिध्दी प्रमुख बशीरभाई, अँड. सी.एच.शर्मा, विरेंद्र उपाध्याय ,श्री नितीन गवळी यांनी दिली आहे काल झालेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्ष तर्फे हि माहिती देण्यात आली आहे

 

यावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी.यासाठी आपने अनेक वेळा मनपाला निवेदन दिले. परंतु कोणतीही कार्यवाही मनपाकडून करण्यात आली नसल्याने ३0 ऑक्टोबर रोजी राजकमल चौक येथे एक दिवशीय धरणे आंदोलन व त्यानंतर भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आम आदमी पार्टीचे , अफसर भाई, महेश देशमुख, संजय शहाकार, अंसार भाई, प्रदीप चौधरी, डॉ.साहीब शकील भाई, रश्मी तिवारी, अर्जून सदार, सतीश ठाकूर, अनासने इत्यादी उपस्थित होते.