७७७८८८९९९ नंबरवरून कॉल म्हणजे अफवा

0
931
Google search engine
Google search engine

मुंबई-
काल दिवसभरात एका मेसेजने व्हॉटसअपवर धुमाकूळ घातला आहे. या मेसेजद्वारे इशारा देण्यात येत आहे की ७७७८८८९९९ या नंबरवरून तुम्हाला फोन आला तर तो फोनकॉल घेऊ नका. हा कॉल तुम्ही घेतलात तर स्फोट होईल. हिंदुस्थानात हा मेसेज वाऱ्याच्या वेगाने पसरायला लागला आहे. आणि जे कोणी हा मेसेज वाचत आहेत ते हादरून गेले आहेत, दहशतीखाली आहे. ट्रू कॉलर नावाचं एक अॅप आहे, ज्यावर एखादा नंबर टाकला तर तो नंबर कोणाचा आहे त्याचं नाव कळतं. काही जणांनी ट्रू कॉलरवर हा नंबर टाकून बघितला तर त्यांना व्हायरस म्हणून नाव दिसायला लागलं.
हा नंबर कोणाचा आहे तपासण्यासाठी आम्ही  लँडलाईनवरून हा नंबर फिरवून बघितला. तर अपेक्षेप्रमाणे हा नंबर चुकीचा असल्याचं कळालं कारण हा फक्त ९ आकडी नंबर आहे. त्यानंतर आम्ही याबाबत अधिक माहिती काढली तेव्हा कळालं की ही काही लोकांनी खोडसाळपणा करण्यासाठी निर्माण केलेली ही एक अफवा आहे. असा कोणताही कॉल येत नसून मोबाईलमध्ये स्फोट होण्याची कोणतीही शक्यता नाहीये.