हिवरखेड येथील पाण सेंटर चालकांनी राबविले व्यसनमुक्ती अभियान – प्रत्येक शनिवारी पान सेंटर बंद ठेवण्याचा घेतला महत्वपूर्ण निर्णय

0
864

!* *१५ हजार लोकसंख्येच्या गावात व्यसनमुक्ती अभियानाचा अभिनव उपक्रम !*

 

 

*रुपेश वाळके मोर्शी तालुका प्रतिनिधी /*

 

 

मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे १५ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये जवळपास २५ पान सेंटर असून हिवरखेड येथील सर्व पण सेंटर चालकांनी व्यसनमुक्तीसाठी पुढे येऊन व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन प्रत्येक शनिवारला गावातील सर्वच पण सेंटर बंद ठेऊन व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्याचा निर्धार केलेला आहे .

 

 

 

सर्वात जास्त कर्करोग हे तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने होतात. तंबाखू सेवनाने फ्फुफुस, अन्न नलिका, किडनी, आतड्या, यकृत सारख्या मुख्य अवयवांवर वाईट परिणाम होणारे रोग उद्भवतात. या पदार्थांचे धोके लक्षात घेऊन सर्वंनीच त्यापासून दूर राहण्याचे सल्ले हिवरखेड येथील पाण सेंटर चालक देतांना दिसत आहे .

 

महाराष्ट्रामध्ये विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. जिल्हास्तरीय सर्वेक्षणात राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे .* *या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या समस्येकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आज भारत देश हा तरुण देश म्हणून ओळखल्या जातो. आणि आजचे तरुण हे सर्वात जास्त तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनाधीन आहेत. मोठ-मोठ्या शहरातील तरुणांमध्ये फॅशन म्हणून तसेच आधुनिक जीवनशैलीमध्ये कामाच्या ताण-तणावामुळे धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे. हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. सध्या ग्रामीण भागात सिगरेटपेक्षा गुटखा, मावा, खैनी यांचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः तरुण मुलामध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. परंतु यामुळे भविष्यात हृदविकार, मानसिक त्रास व अन्य त्रास होण्याची शक्यता आहे.* *सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. तबांखू सेवन व सिगरेट ओढणाऱ्यांचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी हिवरखेड येथील सर्वच पण सेंटर चालकांनी आपली पण सेंटर दुकाने बंद ठेऊन व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे २८ ऑक्टोबर पासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी हिवरखेड सारख्या मोठ्या गावामध्ये सर्वांचा प्रतिसाद मिळाला असून सर्व पण सेंटर चालकांनी हिवरखेड येथील नागरिकांना व तरुणांना निवेदन केले आहे की या व्यसनमुक्ती अभियाना ’निमित्त नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे आणि आपण रोजच्या विषारी व्यसनापासून मुक्त होण्यासाठी व्यसनमुक्तीचा संकल्प करून व्यसनमुक्ती अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन हिवरखेड येथील पण सेंटर चालक पुरूषोत्तम राऊत , दीपक वाघमारे , श्याम गलफट , नवनिर्वाचित सरपंच विजय पाचारे , चून्नीलाल बसले , अविनाश नागले , गणेश मगरदे , विलास रनमले , बंडू भोंड , संजय बेंडे , सुमित चव्हाण , राहुल वैराळे , प्रवीण चव्हाण , ,केदार पाचारे , पप्पू पठाण , ज्ञानेश्वर गावंडे , शालीकराम जयस्वाल , चंदू काळे , संजय काळे , साहेबराव सावरकर , विनोद खोडस्कर , अमर गुळकरी , निलेश राऊत , अंकुश ठाकरे , अंकुश डवरे , श्याम डाखोडे , यांच्यासह आदी युवकांनी केले असून हिवरखेड येथे प्रत्येक शनिवारी सर्वच पाण सेंटर बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन व्यसनमुक्ती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे हे विशेष .*