आज आपचे ‘कचरा डेपो हटाव’साठी धरणे आंदोलन सुकळीच्या कचरा डेपोेविरोधात आप आक्रमक

0
631
Google search engine
Google search engine
अमरावती – (शहेजाद खान) 
 अमरावती महानगर पालिका परिसराला लागून असलेले मौजा सुकळी, अमरावती सर्व्हे नं.१५६ व १५७ येथे अनेक वर्षापासून कचरा डेपो आहे. महानगर पालिका प्रशासनातर्फे शासकीय नियमानुसार कोणतीही दखल व घनकचर्‍याची विल्हेवाट लावल्या जात नाही. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांना प्रदुषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. कचरा डेपो शहरा बाहेर नेण्यात यावा या मागणीसाठी आज ३० ऑक्टोबर रोजी आम आदमी पक्षातर्फे स्थानिक राजकमल चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
   सुकळीच्या कंपोस्ट डेपोतील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात यावी, अन्यथा त्यासाठी पर्यायी जागा शोधावी, या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्यावतीने सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी राजकमल चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कचरा डेपोच्या प्रदुषित वातावरण मुळे त्या परिसरातील नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे. सध्याचे स्थितीत तेथील नागरीक नरक यातना भोगत असून मनपा च्या चुकीच्या धोरणामुळे कचरा डेपोच्या प्रदुषीत वातावरणात जवळपास दोन लाख नागरिक राहत आहे. शासनाच्या धोरणानुसार व प्रदुषीत दुर्गंध हवेत पसरुन साथीचे रोग आजार मोठय़ा प्रमाणात बळावला आहे.
 न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन होत असल्याचा आरोपही लावण्यात आला. शहरातील मृत जनावरे व इतर ही घाण तेथेच टाकण्यात येते मोकाट कुत्रे मेलेले जनावर ओढत रस्त्यावर आणतात संडासचे टाक्यात घाण पाणी येत आहे. त्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहे. स्वच्छ भारत व महाराष्ट्र स्वच्छता अभियान असे शासनाचे स्पष्ट आदेश असतांना मनपा कोणतेही ठोस पावले उचलत नाही. दुषीत वातावरण व पिण्याचे पाणी प्रदुषीत पाणी व दुर्गंधी संडासची घाण व पाणी त्यामुळे शेजारी असलेली हजारो एकर जमीत पडीत पडलेली आहे. यावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी यासाठी आप ने अनेक वेळा मनपाला निवेदन दिले. परंतु कोणतीही कार्यवाही मनपाकडून करण्यात आली नसल्याने ३० ऑक्टोबर रोजी राजकमल चौक येथे एक दिवशीय धरणे आंदोलन व त्यानंतर भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, बशीरभाई, अँड. सी.एच.शर्मा, विरेंद्र उपाध्याय, अफसर भाई, महेश देशमुख, संजय शहाकार, अंसार भाई, प्रदीप चौधरी,
 शकील भाई, रश्मी तिवारी, अर्जून सदार, सतीश ठाकूर यांनी सांगितले.