*हिवरखेड येथे नवनिर्वाचित ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार !*

0
1091

गटाच्या राजकारणातून बाहेर पडून जनतेची कामे करावी -श्री हर्षवर्धन देशमुख

रुपेश वाळके / मोर्शी /-

*मोर्शी तालुक्यात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या हिवरखेड येथीम ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये हिवरखेड येथील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या सरपंच उमेदवाराला विक्रमी मतांनी निवडून देऊन ११ ग्राम पंचायत सदस्यांना भरघोस मतांनी निवडून दिले, ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला . त्यावेळी माजी कृषी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख मार्गदर्शन करतांना म्हणाले की हिवरखेड येथील निवडणुकीमध्ये एका सर्वसामान्य युवकाच्या पाठीशी उभे राहून सरपंच व सदस्यांना गावातील प्रत्येक समाजाने मते दिली गटाच्या राजकारणातून बाहेर पडून जनतेची कामे करावी पुढल्या वेळेस याही पेक्षा जास्त मतांनी निवडुन याल त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका हिवरखेड वासीयांनी पक्षावर आणि पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून भरभरून मतदान केले आहे. तसेच, गावाचा विकास करताना तो पूर्ण पारदर्शी कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपाद हर्षवर्धन देशमुख यांनी केले.*

*माझ्या कार्यकाळाच्या १५ वर्षांमध्ये मी आणलेल्या निधी एवढी विकासकामे कुणीही आणू शकले नाही . प्रामाणिकपणे काम कराल तर मानसिक समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही . ज्यांना २०१४ च्या निवडणुकीत निवडून दिले त्यांनीच मतदारांचा भ्रमनिराश केला त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत परिणाम दिसतीलच असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी दिला .*

*यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामेशपंत वडस्कर , शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख , प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण सभापती श्रीपादराव ढोमने , माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालिताई प्रकाश विघे , जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमने , समाजकल्याण सभापती सौ सुशीला कुकडे , नवनिर्वाचित सरपंच विजय पाचारे , गजानन वाघमारे , अनिल अमृते , डॉ प्रदीप कुऱ्हाडे , नरेंद्र जिचकार , प्रकाश विघे , उमेश गुडधे ,अतुल उमाळे , आनंद सदातपुरे , राजाभाऊ कुकडे , अशोक ठोंबरे , विनोद ठोके , मनोहर आमले , अनिल बंड , जमील कुरेशी , अशोक राऊत , बाबाराव राऊत , यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमने , समाज कल्याण सभापती सुशीला कुकडे यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच विजय पाचारे , बेलोना येथील सरपंच गजानन वाघमारे , तसेच नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य रामेश्वर चव्हाण , आशा पाचारे , जायदा बी शाहीदखा पठाण , आशा दारोकर , राजू गेडाम , मंगेश पवार , कमल पाचारे , सुनीता अकोलकर , संजय काळे , सुनंदा गावंडे , नलिनी बागेकर , यांचा भव्य सत्कार समारंभ शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी हिवरखेड येथील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती .*