*अचलपूर नगरपालिका पाणीपुरवठा आजारी रायपू-यात आज़ही वाहत आहे पाणी रस्त्यावर*

0
689
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/–


नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी आजारी असते.शहरात अनेक ठिकाणी जलवाहिण्यामध्ये लीकेज पाहायला मिळतात पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करतांना दिसते.
        गेल्या अनेक महिन्यापासून स्थानीक रायपूरा विभागातील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील पाणीपुरवठा जोडनी असलेल्या ठिकाणी लीकेज झालेले आहे व त्यामधून अवास्तव पाणी रस्त्यावर वाहत आहे.याबाबत नगरसेवक यांना सांगूनही कार्यवाही झाली नाही.वृत्तपत्रांतून या गोष्टीचा उजाळा करण्यात आला मात्र आजही या लिकेजला दुरुस्त करण्यात आले नाही.या जागेवर वस्तीत फिरणारे मोकाट डूकरे पाणी पीतात व बसतात सुध्दा त्यामुळे त्यांच्या शरीरावरील जंतू पाण्यावाटे जनतेच्या घरातील पाण्यामध्ये मिसळून दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे या बाबतीत प्रशासनाने त्वरित गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा परिसरातील जनतेला रोगांचा प्रार्दुभाव झाल्यास नगरपालिका व पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील असे संत गाडगे महाराज तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रमोद नैकेले यांनी म्हटले आहे.