ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण

0
667
Google search engine
Google search engine

महेन्द्र महाजन जैन /-
वाशिम – ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दि. १७ व १८ मे २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. १७ मे रोजी दुपारी ४.३० वाजता हिंगोली येथून हेलिकॉप्टरने मालेगाव तालुक्यातील शिरपूर खंडाळाकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता शिरपूर खंडाळा येथे आगमन व राखीव. सायंकाळी ५.१५ वाजता शिरपूर खंडाळा येथील ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण. सायंकाळी ६ वाजता शिरपूर खंडाळा येथून वाशिमकडे प्रयाण. सायंकाळी ६.३० वाजता वाशिम येथील एस. एम. सी. स्कूलमध्ये आयोजित संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८ वाजता वाशिम येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
दि. १८ मे रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत राखीव. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना अंतर्गत बेलमंडल (ता. कारंजा), कुप्ता (ता. मानोरा), आसेगाव (ता. रिसोड) येथे मंजूर ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांचे भूमिपूजन निमित्त महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय प्रांगणात जनतेच्या तक्रारी स्वीकारून निवारणासाठी राखीव. यामध्ये महावितरण, महापारेषणसह राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. दुपारी १ ते २ राखीव. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात लोकप्रतिनिधींच्या समवेत बैठक. दुपारी ४.३० वाजता वाशिम येथून पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोलाकडे प्रयाण.