जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ

0
683
Google search engine
Google search engine

अमरावती :-

: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन कार्यक्रम झाला. राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व अधिकारी- कर्मचा-यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ यावेळी घेतली.
अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे व इतर कर्मचा-यांनीही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.