थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांची  वीज कापणार-तालुक्यात वीज कापणीला सुरुवात

0
577

थकबाकी भरून शेतकरी यांनी आपली गैरसोय टाळावी:- उप कार्यकारी अभियंता सुधीर वानखडे याचे शेतकरी आव्हान

बादल डकरे / चांदुर बाजार –

ऊर्जा मंत्री यांनी थकबाकी कृषी पंपाच्या वीज कंपनीला सुरुवात करण्याचं आदेश दिले असताना सात दिवसाच्या कालावधी मध्ये जर वीज थकबाकी न भरणाऱ्या शेतकरी याची वीज कापली जाणार असल्याचे स्पस्ट केले आहे.चांदुर बाजार तालुक्यात सुद्धा वीज कापणीला सुरुवात झाली असून उप कार्यकारी अभियंता सुधीर वानखडे यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग यांनी आपली चालू वीज भरावी जेणेकरून आम्हाला त्याची वीज कापावी लागणार नाही.
चांदुर बाजार तालुक्यामध्ये 8000 कृषी पंप आहे .काही सेंटर वर वीज कापणी ला सुरुवात झाली आहे तर काही सेंटर कापणी ची मोहिम सुरू लवकरच होणार आहे.परतीच्या पावसामुळे तालुक्यात चांगलाच कहर केला होता त्यामुळे शेतकरी यांच्या तोंडातील घास हिसकवला गेला.संत्रा गळून पडला,सोयाबीन पूर्णतः जागेवरच सडून गेले,उडीद मूग सुद्धा नष्ट झाले आता सध्या तालुक्या कापूस पीक असून सोबत सोयाबीन निकामी झालेल्या शेतात शेतकरी आता हरभरा पेरण्याच्या तयारीत आहे तर तिकडे संत्रा जो काही शिल्लक आहे त्याला पण पाणी देण्याची आवश्यकता आहे अश्या वेळेस जर कृषी पंपाची वीज कापणी केली तर शेतकरी हा मोठ्या संकटात सापडतील त्यामुळे आता राज्य सरकार च्या या निर्णयामुळे शेतकरी यांची काय अवस्था होणार हे पाहावेत लागेल.

*उपकार्यकरी अभियंता याची प्रतिक्रिया*

चांदुर बाजार तालुक्यात एकूण 8000 च्या जवळ पास कृषी पंप आहे.माध्यतरी चा काळ या शेतकरी वर्गासाठी खूप बिकट गेला आहे.आता घेण्यात येणाऱ्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकरी वर्ग यांनी आपनी मार्च आणि मे महिन्यात थकबाकी ची रक्कम भरावी आणि आपली वेळेवर होणारी गैरसोय टाळावी.