चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नाफेड कडे शेतकरी यांची पाठ-नाफेड पेक्षा व्यापारी वर्ग याना पसंती

0
760

👉🏻ऑनलाइन प्रक्रिये मुळे शेतकरी त्रस्त

बादल डकरे / काजळी देउरवाड़ा-

चांदुर बाजार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणीकृत मोजकेच व्यापारी असून त्यातही काही दोन ते तीन व्यापारी घराणे बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या मालाची बोली बोलतात व खरेदी करतात. यामुळे व्यापारी बोलतील त्याच भावात शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत असल्याने शेतकरी वर्गात रोष व्यक्त होत आहे.
दिनांक 29 ला चांदुर बाजार समिती आवारात व्यापारी यांचे जवळ पास 8000 ते 10000 पोत्याची खरेदी झाली तरी तिकडे नाफेड मध्ये आता पर्यंत याच्या माहिती च्या आधारे 60 ते 65 पोतेआले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हा व्यापारी या सर्वात जास्त पसंती देत असल्याचे चित्र चांदुर बाजार तालुक्यात आहे.तसेच नाफेड च्या खरेदी करीत ज्या प्रकारचे सोयाबीन पाहीजेत त्याची संख्या फार कमी असल्याने शेतकरी हा आपला सोयाबीन व्यपारी याना विकत आहे.
सध्या सणासुदीच्या काळात शेतकरी वर्गाला पैशांची गरज असते. त्यामुळे हाती आलेले पीक विकण्याची घाई शेतकरी वर्ग करतात

ग्रामीण भागातील शेतकरी याना पाहिले नोंदणी करावी लागत असल्याने त्याची डोकेदुखी तर वाढलीच सोबतच त्याचा वेळ पण द्यावा लागत आहे.आपले सर्व कामे सोडून त्यांना तालुक्यावर नोंदणी करण्यासाठी यावे लागत असल्याने शेतीच बरीच शी कामे कोलबली जात आहे त्याचा परिमाण व्यापारी हा आपल्या घरी येऊन माळ खरेदी करीत आहे त्यामुळे शेतकरी हा आपले सोयाबीन व्यापारी याना देणेच फायदेशीर म्हणून विकत आहे.करण नाफेड मध्येसोयाबीन करीत नोंदणी केली ,सोयाबीन विक्री करीत चांदुर बाजार येथील बाजार समिती मध्ये आणले आणि ग्रेडर ने जर ते न पसंद केले तर पुन्हा परत नेने त्या साठी शेतकरी हा आपल्या सोई नुशार सोयाबीन ची विक्री करीत आहे.त्यामुळे साड्या तरी नाफेड मधील सोयाबीन विक्री ला शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे.

*विविध निकषात अडकली नाफेड ची खरेदी*

शासनाने अत्यंत अपमानकारक असलेला सोयाबीन चा हमीभाव आपल्या मालाला मिळवायचा असल्यास शेतकऱ्यांना विविध निकषामधून जावे लागत आहे. पहिले आपल्या मालाची ऑनलाइन नोंदणी करा, नंतर बाजार समिती तुम्हाला फोन करून माल बोलाविल्या जाईल त्यातही तुमचा माल एकदम चांगला व नाफेड च्या निकषात बसत असेल तर तो खरेदी केल्या जाईल, व त्यानंतर महिन्याभरात पैसे मिळेल.