शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास स्वस्थ बसणार नाही – श्री देवेंद्र भुयार <>●<> शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दापोरी येथे उद्या चक्काजाम आंदोलन

0
621
Google search engine
Google search engine

मोर्शी वरुड तालुक्यातील हजारो शेतकरी होणार आंदोलनात सहभागी !

रुपेश वाळके / मोर्शी –

मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या २ नोव्हेंम्बर रोजी दापोरी येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीय भव्य चक्काजाम आंदोलन होणार असून शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात वीज कनेक्शन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गत ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ही स्थिती समोर आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

वीज वितरण कंपनीने सुरू केलेली वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम बेकायदेशीर असून शेतकऱ्यांनी याचा विरोध करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी केले आहे.
वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा कट करण्याची मोहिम सुरू केली आहे. एकतर वरुड मोर्शी तालुक्यामध्ये संत्रा फळ पिकाचे मृगाचे उत्पादन 67 हजार हेक्टर तर आंबिया बहराचे उत्पादन 45 हजार हेक्टर आहे कापूस पिकाची लागवड 75 हजार हेक्टर तर मिरची पिकाची लागवड 3 हजार हेक्टर आहे त्यामध्ये महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकाला ओलित करणे फार कठीण झाले आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे कोट्य वधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

वीजपुरवठा खंडीत करण्यापूर्वी शेतकऱ्यांना शेती पंपाची बिले देऊन पंधरा दिवसा आधी ग्राहकास नोटीस पाठवणे आवश्यक असते. हा नियम महवीतरणाकडून कधीच पाळला जात नाही. आणि शेतकऱ्यांना अजूनही कृषी पंपाचे वीज बिल अजूनही मिळाले नाही . शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता वीज उपकेंद्रातूनच वीज पुरवठा खंडित करणे हे कोणत्याच कायद्यात बसत नाही. वीज मंडळाची ही मोहिम बेकायदेशीर असल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला आहे.

गारपीटग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत तात्काळ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आज दापोरी येथे आज २ नोव्हेंम्बर रोजी मोर्शी वरुड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य चक्काजाम आंदोलन होणार आहे .
सोयाबीनचे नुकसान झाले, कपाशीला भाव नाही आणि संत्राला आता मातीमोल भाव मिळत आहे . उत्पादन खर्च तर सोडा साधा तोडणीचा खर्च निघणे कठीण असतांना शासन मात्र मुक गिळुन बसले आहे. यालट राज्यात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस व कॉेग्रेसचे सरकार होते त्यावेळी वेळीवेळी राज्य शासनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यात आली होती. किमात तशी तरी मदत या सरकारने करावी. जो पर्यत शेतकऱ्यांना सरकार मदत करीत नाही त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यत आपण स्वस्त बसणार नाही असे आवाहन करीत राज्य सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांनी आंदोलनाचा ईशारा दिला . गेल्या काही दिवसापासुन शेतकऱ्यांची परिस्थीत आज हालाखीची आहे. अंबीया बाहार चांगला आल्याने यातुन काही मदत होईल अशी अाशा असतांना बाजारात चांगला भाव मिळत नाही. बाजारात आज संत्राला २००० हजार रुपयापासुन तर ३५०० हजार रुपये पर्यत भाव मिळत आहे. यातुन साधा तोडणीचा खर्च सूध्दा निघत नाही. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतक-यांचा शेकडो टन संत्रा झाडालाच लटकलेला आहे . संत्रा तोडणे सुध्दा परवडत नसल्याने संत्रा झाडालाच आहे. तो आता गळुन पडत आहे. वीज कनेक्शन तोडणी थांबवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी तात्काळ वीज पुरवठा सुरू करावा पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी , यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दापोरी येथे आज चक्काजाम आंदोलन होणार असून मोर्शी वरुड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी दापोरी येथील चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांनी केले आहे .