‘शेरू’च्या ऐंट्रीनंतरही शहरात अवैध दारू सुरूच चांदुर रेल्वे पोलीसांचा हलगर्जीपणा “पहिले पैसे द्या अन लपवलेल्या ठिकाणावरून दारू घेऊन जा !”

0
589
Google search engine
Google search engine


चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)-


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 31 मार्च 2017 रोजी राज्यातील राज्य मार्गाच्या व राष्ट्रीय महामार्गालगत 500 मीटर अंतराच्या आत असलेल्या दारू दुकानांवर बंदी घालण्यात आली. असे असले तरी शहरात अवैध रीत्या अनेक ठिकाणी दारू सर्रास उपलब्ध होत आहे. रविवारी एका शहरवासीयाने दारू घेणाऱ्या युवकास पडकले. मात्र त्या तळीरामाने हाताला झटका मारूण पळ काढला. असे प्रकार शहरात घडत असतांनासुध्दा पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे पोलीसांचा असाही हलगर्जीपणा समोर आला आहे. आता याकडे नवीन रूजु झालेले ग्रामिण पोलीस अधिक्षक कधी लक्ष देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


         सगळीकडे गेली अनेक वर्षे दारूबंदी व्हावी या मागणीसाठी महिला संघटनांसह इतरही संघटना लढा देत होत्या. मात्र ती काही बंद होत नव्हती. बेकायदेशीर, परवानाधारक अशा पद्धतीने विक्री होत असलेली दारू अनेकांचा संसार बुडवती झाली. होलसेल, रिटेल दुकाने सकाळीच ग्राहकांनी फुल्ल दिसत होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दारू दुकानांवर बंदी घातल्याने दारू पिणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. मात्र तरीही चांदुर रेल्वेत दारू विक्रेत्यांनी दाराच्या आडून अवैध दारू विक्री करण्याचा सपाटा सुरुच ठेवला. व दारूचा दरही वधारला आहे. दर वाढूनही तळीरामांना दारू मिळतच आहे. असे असतांना सुध्दा स्थानिक राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणा यांनी अद्यापही कुठलीही कारवाई केली नाही. शहरातील आठवडी बाजारात दररोज सकाळी ५-६ वाजतापासुन रस्त्यावर दारू विक्री होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अशातच आठवडी बाजार परीसरात रविवारी सकाळी दारू विकत घेतल्यानंतर एका युवकाला त्या परीसरातील एका शहरवासीयाने पकडले. व दारूविक्रीबद्दल माहिती विचारली असता त्या युवकाने हाताल झटका देत पळ काढला. मिळालेल्या माहीतीनुसार दररोज सकाळी काही दारूविक्रेते बाहेरून पोत्यात भरून दारू बॉटल आणतात व बॉटल वेगवेगळ्या ठिकाणी, झाडाझुडपात लपवुन ठेवतात. व त्या परीसरात एका ठिकाणी बसुन जातात. गिऱ्हाईकाकडुन  पहिले पैसे घेतात व बोटाने जागा दाखवुन तेथुन स्वत:च बॉटल घ्यायला सांगतात. अशाप्रकारे दारूची अवैध विक्री शहरात सुरू असल्याची माहीती त्या परीसरातील राहणाऱ्यांनी दिली. मात्र जिल्ह्यातील खराब झालेल्या कायदा व्यवस्थेला दुरूस्त करण्यासाठी नवीन पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार यांची नागपुर येथुन अमरावतीला बदली करण्यात आली. अभिनाश कुमार हे अवैध दारू, सट्टा याच्या तीव्र विरोधात आहे. यापहिले ते नागपुर पोलीस आयुक्तालयात जोन क्र. ३ मध्ये पोलीस उपायुक्त बनुन गेले असता दारूमुळे त्यांनी त्यापरीसरातील जवळपास ४०० सावजी मटन दुकानांवर खळबळ माजवली असल्याची माहिती आहे. असे असतांना सुध्दा अमरावती जिल्ह्यात झालेल्या या शेरूच्या ऐंट्रीनंतरही चांदुर रेल्वे पोलीसांच्या आशिर्वादाने शहरात अवैध दारू सुरूच आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक याकडे लक्ष देणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे..