शिवसेनेचा शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न जळका (जगताप) येथे आयोजन

271
जाहिरात

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .)


चांदुर रेल्वे तालुक्यातील जळका (जगताप) येथे शिवसेनेचा शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न नुकताच संपन्न झाला.
      सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार मंगेश कुदालकर, मुंबईचे नगरसेवक दत्ता पोगडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बंड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाला राणे यांची उपस्थिती होती. या शेतकरी संवाद कार्यक्रमात जळका येथील शेतकऱ्यांनी शेती उत्पादन खर्चावर आधारीत मालाला भाव, स्वामीनाथन आयोग लागु करणे, शेतकरी कर्जमुक्ती, शासकिय समीत्या अजुनही आत्मा कमीटी नाही, ती तयार करावी आदी समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख राजु निंबर्ते यांनी तर सुत्रसंचलन  बंडू आंबटकर यांनी केले.
         कार्यक्रम यशस्वीतेकरीता कौस्तुभ खेरडे, त्रिलोकचंद मानकानी, पठान, जयसिंगपुरे, स्वप्निल मानकर, अनूप दुबे, मोरेश्वर राजुरकर, जयदत्त देवडे, विशाल देशमुख व जळका येथील  शिवसैनिकांनी परीक्षम घेतले. यावेळी गावातील अनेक शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते..

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।