भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्याचे लाचलुचपत विभागाचे आवाहन

0
678
Google search engine
Google search engine
मुंबई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने३० ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती साप्ताह – २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचारापासून मुक्तीसाठी या सप्ताहात जनजागृती करण्यात येणार आहे

कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंध प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक1064, व्हॉट्सअॅप क्रमांक ९९३०९९७७००, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९२२६१८ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या तक्रारीabcwebmail@mahapolice.gov.in आणि addlcpacbmumbai@mahapolice.gov.in या ईमेलवर कराव्यात, असेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त केशव पाटील यांनी केले आहे.