दारापुर येथील पारधी बेड्यावर खोलापुर पोलिसांची  दोन ठिकाणी धाड – अवैध गावठी दारू जप्त

0
679
Google search engine
Google search engine

वाठोडा शुक्लेश्वर / गजानन खोपे –

खोलापुर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दारापुर येथील पारधी बेड्यावर धाड टाकून खोलापुर पोलिसांनी ६ हजार ४०० रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे ही कारवाई काल १ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली खोलापुर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन पोलिसांनी दारापुर येथील पारधी बेड्यावर दोन ठिकाणी धाड टाकुन तसेच यावेळी ६ हजार ४००रुपयांची गावठी दारू जप्त करून दोन्ही आरोपीलाअटक करण्यात आली.

१)लखन बच्चु पवार वय अंदाजे ३०वर्षे

२)सौ अर्चना अक्षय सोळंके वय २५वर्षे

राहाणार दारापुर असे दोन्ही आरोपी चे नाव आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शन खाली ठाणेदार श्री सतीश चवरे,पी.एस.आय श्री विनोद जांभळे श्री दिपक कटयामल.वैध.मनोज सावरकर. श्री राजेंद्र काळे ,श्री दिनेश इंगोले.विशाल कौवलकर .शुभम शर्मा. सुरज फुकट. नंदा सातपुते.प्रभाकर हभरडे यांनी केली आहे