ऑटोरिक्षा, टॅक्सी भाडे सूत्र ऑनलाईन अभिप्राय

0
851
Google search engine
Google search engine

महेंद्र महाजन जैन /  रिसोड –

वाशिम :  राज्यातील ऑटोरिक्षा, टॅक्सी भाडे सूत्र ठरविण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी भाडे सूत्र ठरविण्यासाठी राज्यातील ऑटोरिक्षा, टॅक्सी संघटना व ग्राहक यांना समितीकडे आपली मते मांडता यावीत, याकरिता संगणकीय सर्व्हे ऑनलाईन स्वरुपात घेण्याचे ठरले आहे. या सर्व्हेचे नमुनेwww.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जनतेचा अभिप्राय, ऑटोरिक्षा चालक अभिप्राय, टॅक्सी चालक अभिप्राय व ऑटोरिक्षा, टॅक्सी संघटनाचा अभिप्राय आदी नमुने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा सर्व्हे दि. १५ मे २०१७ पर्यंत सुरु राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी आपले अभिप्राय सादर कारानायचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.