प्राचार्य वानखेडेंच्या हत्येचा लागला छडा, मुलगी व पत्नीनं दिली होती 5 लाख रुपयांची सुपारी. 5 आरोपींना अटक.

0
621
Google search engine
Google search engine

नागपूर/-
नागपुरात नीरी गेट जवळ चंद्रपूरच्या एका प्राचार्याचा खून झाल्याची घटना समोर आली होती श्री मोरेश्वर वानखडे (वर्ष 55) असे या प्राचार्यांचे नाव असून ते चंद्रपूर येथील एका प्रख्यात खत्री कला वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य असल्याचे सांगण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती होती ,मोरेश्वर वानखडे यांची आज सकाळी ८ च्या सुमारास नागपूर चंद्रपूर मार्गावरील नागपूर शहरात असलेल्या निरी पर्यावरण संशोधन संस्थेसमोर अज्ञात व्यक्तींकडून तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली ,नागपुरात गेल्या 3 दिवसातील तिसरी खुनाची घटना होती परंतु आता प्राचार्य वानखेडेंच्या हत्येचा छडा, लागला मुलगी व पत्नीनं दिली होती 5 लाख रुपयांची सुपारी. 5 आरोपींना अटक. करण्यात आली आहे