घराला घरपण देणाऱ्या – डीएसके समूहाची 70 बँक खाती गोठविली

0
1280
Google search engine
Google search engine

आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या श्री डी.एस.कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांची संख्या वाढली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 599 ठेवीदारांनी तक्रारी दिल्या असून फसवणुकीचा आकडा 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान कुलकर्णी दाम्पत्यावरील दाखल गुन्ह्यांमध्ये आणखी कलमे वाढविण्यात आली असून, डीएसके समूहाची 70 बँक खाती गोठविण्यात आली आहेत. याशिवाय डीएसकेच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती मिळविण्यासाठी ईडी व सेबीकडे अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.