कमल हसनला फासावर लटकवायला हवे : हिंदू महासभा

0
684

कमल हसन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे किंवा फासावर लटकवले पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणाऱयांना जगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून, हिंदुत्त्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे, असा आरोप कमल हसन यांनी त्यांच्या लेखातून केला होता.