पद्मावती चित्रपटाच्या प्रकरणी मी कोणत्याही प्रकारे तटस्थ राहू शकत नाही ! – केंद्रीयमंत्री उमा भारती

0
627
Google search engine
Google search engine

नवी देहली – वादग्रस्त पद्मावती या चित्रपटाच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर मी कोणत्याही प्रकारे तटस्थ राहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी व्यक्त केली. त्यांनी याविषयी केलेल्या ट्वीटमध्ये राणी पद्मावती यांना राजपूत समाजासमवेत न जोडता भारतीय स्त्रीच्या अस्मितेशी जोडण्यात यावे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इतिहासकार, चित्रपट निर्माते, आक्षेप घेणार्‍या समाजाचे प्रतिनिधी आणि चित्रपट परीनिरीक्षण मंडळ यांनी समिती बनवावी अन् यावर निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.